Headlines

कुजलेल्या अवस्थेत सापडले प्रेत , दोन तासांत पोलिसांनी केला उलगडा

पालघर ते मनोर रोडवरील वाघोबा घाटात कुजलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या एक अनोळखी महीलेचे प्रेताबाबत दाखल खुनाचे गुन्हयाचा पालघर पोलीसांनी दोन तासात केला उलगडा.

पालघर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०३.०२.२०२२ रोजी १७.३० वा.चे दरम्यान पालघर ते मनोर रोडवरील बाघोबा घाटात एका अनोळखी महीलेस कोणीतरी अज्ञात कारणामुळे जिवे ठार मारुन घाटात फेकुन दिले होते. सदर महीलेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने फिर्यादी श्रीमती भाविका भगवान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इसमांविरुध्द पालघर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजी नंबर ३४ / २०२२ भा.दं.वि.सं. कलम ३०२, २०१ प्रमाणे दिनांक- ०४.०२.२०२२ रोजी ०२.०० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक पालघर यांचे आदेशान्वये, श्री. प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती निता पाडवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक श्री विष्णु भोये प्रभारी अधिकारी पालघर पोलीस ठाणे, श्री. प्रदिप कसबे, पोलीस निरीक्षक मनोर पोलीस ठाणे, श्री सुधिर धायरकर सपोनि सातपाटी पोलीस ठाणे, श्री. संदिप कहाळे, सपोनि सफाळा पोलीस ठाणे, श्री. सतिश गवई सपोनि केळवा पोलीस ठाणे तसेच पालघर विभागातील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून सुचना देवून गुन्हयाचा तपास चालु केला.

नमुद गुन्हयात कोणताही धागेदोरे नसताना श्रीमती निता पाडवी, उप विभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग यांनी गुन्हयाचा तपास स्वतःकडे घेवून गुन्हयाचा तांत्रीक दृष्टया कौशल्यपुर्ण तपास करून यातील अनोळखी मयत महीला ही बांद्रा पोलीस ठाणे मुंबई येथे मिसींग दाखल असले बाबत माहीती प्राप्त केली. सदर गुन्हयात एकमेव पुराव्याचे आधारे तपास करून दोन संशयित इसमांना विरार कन्हेर फाटा व मुंबई ब्रांदा येथुन ताब्यात घेवून त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता, त्यांनी यातील मयत हिस प्रेमसंबधातुन पालघर मनोर रोडवरील बाघोबा घाटात जिवे ठार मारले असल्याचे कबुल केले आहे.

सदरची कामगिरी श्री. दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक पालघर जिल्हा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती निता पाडवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग, पोलीस निरीक्षक श्री विष्णु भोये, प्रभारी अधिकारी, पालघर पोलीस ठाणे, श्री. प्रदिप कसबे, पोलीस निरीक्षक मनोर पोलीस ठाणे, श्री सुथरारकर सपोनि सातपाटी पोलीस ठाणे, श्री. संदिप कहाळे, सपोनि सफाळा पोलीस ठाणे, श्री. सतिश गबई सपोनि केळचा पोलीस ठाणे, पोहवा / मानिक कर्डीले उप.पो.अधि.कार्या. विभा. पालघर, सहा. फीज./आतकारी, पो.हवा/सुभाष खंडागळे, पो.ना./ आव्हाड, पो.ना. / मुसळे, पो.ना./ पालवे, पो.ना./ वाघमारे, पालघर पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *