कोणी नोकरी देता का नोकरी? वर्ल्ड कप खेळलेला ‘हा’ खेळाडू आर्थिक संकटात


Vinod Kambli – खेळाडूच्या संघर्षाचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. सध्या OTTवर महिला क्रिकेटपटू मिताली राज हिच्या संघर्षावर चित्रपट प्रसिद्ध झालं आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोणी यावरही चित्रपट येऊन गेला आहे. पण काही क्रिकेटपटूंचं आयुष्य भारतीय क्रिकेट संघात खेळानंतरही संघर्षमय असतं. 

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा जिवलग मित्र विनोद कांबळीवर घरखर्च आणि दैनंदिन गरजांसाठी झगडण्याची वेळ आली आहे. विनोद कांबळी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे उदरनिर्वाहसाठी कामाची मागणी केली आहे. ( trending news cricket vinod kambli facing financial trouble seeking assignment from mca to survive in marathi)

या अवस्थेत दिसला विनोद कांबळी

काय स्टायलिश दाढी आणि हेअरकटमध्ये मॉडेलसारखा दिसणारा कांबळी आता खूपच वेगळा दिसतो आहे. कांबळीच्या गळ्यातील सोन्याची चेन, ब्रेसलेट आणि महागडे घड्याळ आता दिसत नाही आहे. त्याचा हातातील मोबाईल फोनचा स्क्रीन तुटलेल्या अवस्थेत आहे. तर तो मुंबई क्लबमध्ये कारने येत नाही. 

मला कामाची गरज आहे – कांबळी

विनोद कांबळीचा एक फॅन नदीम मेमन कांबळीला त्याच्या वांद्रे पश्चिममधील घरातून पिक करून MCA-BKC क्लबमध्ये घेऊन येतो. यावर कांबळीला विचारल्यावर तो म्हणाला की, उदरनिर्वाहासाठी एमसीएकडून काही काम हवे आहे. क्रिकेटशी संबंधित कुठलंही काम करायला तो तयार आहे. सध्या विनोद कांबळीला बीसीसीआयकडून दरमहा केवळ 30 हजार पेन्शन मिळते, ज्यावर जगणे कठीण झालं आहे. त्यामुळे त्याला दुसरं काही काम करायचे आहे.

सचिन तेंडुलकरने मदतीची हात दिला मात्र…

काही काळापूर्वी कांबळी सचिन तेंडुलकरच्या तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षक म्हणून रुजू झाला. पण त्याने ती नोकरी सोडली. कारण ती अकादमी नेरूळमध्ये होती, जिथे पोहोचण्यासाठी मला पहाटे 5 वाजता उठून कॅबने जावं लागायचं. यानंतर संध्याकाळी कोचिंगसाठी बीकेसी मैदानात यावं लागतं होतं, हे खूप कठीण होतं, असं विनोद कांबळी म्हणाला. 

कांबळीने पहिल्या 7 कसोटी सामन्यांमध्ये खळबळ उडवून दिली होती. होय, भारतीय क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण करणाऱ्या कांबळीची एकेकाळी टीम इंडियाच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना व्हायची. 30 वर्षांपूर्वी जेव्हा त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या 7 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 113.29 च्या सरासरीने 793 धावा केल्या होत्या. तसंच तो सर्वात कमी वयात द्विशतक करणारा तिसरा फलंदाज देखील आहे. Source link

Leave a Reply