किती तो त्रास? सौंदर्य जपण्यासाठी अभिनेत्रीनं सहन केल्या असह्य वेदना


मुंबई : सुंदर मी होणार…. हा मूलमंत्रच जणू काही सौंदर्यवती जपत असतात. रुप, बांधा सर्वकाही जपण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरु असतो. ही शस्त्रक्रिया, नावंही लक्षात राहणार नाहीत इतके क्रीम असा बराच घाट त्या घालतात. तुम्हाहा माहितीये का, सौंदर्य जपण्यासाठी त्या वेदनाही सहन करतात. आता हे कसलं वेड ते ठाऊक नाही, पण एका अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया स्टार आणि मॉडेलनं याचीच प्रचीती सर्वांना दिली आहे. 

रिअॅलिटी टीव्ही स्टार अशी ओळख असणारी ही सेलिब्रिटी आहे, किम कार्दशियन (Kim Kardashian). किम तिच्या फॅशन सेन्स आणि मादक रुपासोबतच कमनीय बांध्यामुळंही नजरा वळवते. तिचा डाएट, व्यायामाची पद्धत याविषयीसुद्धा चाहत्यांना कमाल कुतूहल. (Hollywood star Kim Kardashian shares photo of Laser treatment on stomach)

हीच किम यासाठी किती वेदना सहन करते तुम्हाला माहितीये ? सौंदर्य अबाधित राहवं यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असणाऱ्या किमनं नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 

Kim Kardashian West | Zee News

फोटो पाहता ती स्टमक टाइटनिंग (Stomach Tightening) ट्रीटमेंट घेत असल्याचं लक्षात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तिनं एक शॉकिंक ट्रीटमेंट घेतली आहे. ज्यामुळं कंबर आणि पोटाचा भाग कमनीय ठेवता येईल. या साऱ्यासाठी तिनं बक्कळ पैसा मोजला हे खरं. पण, सोबतच असह्य वेदनांनाही ती सामोरी गेली. 

Kim Kardashian

41 वर्षीय किम जगातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या महिलांपैकी एक आहे. खासगी आयुष्यातील उलथापालथ, पूर्वायुष्याचे गौप्यस्फोट या सर्व कारणांमुळे ती सातत्यानं प्रकाशझोतात असते. Source link

Leave a Reply