“खूप झालं आता! यांच्यावर खटले चालवले जातील, हा तळतळाट…” शिंदे गटाविरोधात संजय राऊत पुन्हा आक्रमक | sanjay raut criticizes eknath shinde says rebel mlas will definitely returnजामिनावर बाहेर आल्यानंतर संजय राऊत राज्याच्या राजकाणात पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. संजय राऊत यांनी आज (११ नोव्हेंबर) शिवसेना पक्षातील बंडखोरीवर पुन्हा एकदा भाष्य केले. आता खूप झाले. या लोकांवर जनतेच्या न्यायालयात खटले उभारले जातील. ते महाराष्ट्राला कमजोर करत आहेत, अशी घणाघाती टीका केली. तसेच त्यांनी परत फिरायला हवे. बंडखोरी केलेल्यांमधील काही आमदार परत येतील, याची मला खात्री आहे, असेही संजय राऊत म्हणाले ‘एबीपी माझा’ने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा >>>“मी तुलना करणारच,” टिळक, वीर सावरकरांचे नाव घेत संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले…

“जे सोडून गेलेले आहेत ते काहीही कारणं सांगत आहेत. हिंदुत्व, महाराष्ट्राचा स्वाभिमान याचा ते दाखला देत आहेत. तुम्ही दहा पक्ष फिरून शिवसेनेत आलेले आहात. सध्याच्या राजकारणात स्वाभिमानाचा दाखला कोणीही देऊ नये. या लोकांनी परत फिरलं पाहिजे. आता खूप झाले आहे. महाराष्ट्र कमजोर होत आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा >>> “कोणावरही वेळ येऊ नये” तुरूगांत घालवलेल्या दिवसांवर बोलताना राऊत म्हणाले, “मी तर विचार करतो की…”

“भविष्यात महाराष्ट्रातील जनता या लोकांवर राज्याला कमजोर केल्याबद्दल खटला चालवेल. जनतेच्या न्यायालयात यांच्यावर खटले चालवले जातील. मी जे सांगतोय तो तळतळाट आहे. तळमळ आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचे पाणी करून शिवसेना उभी केली. या शिवसेनेतून आमच्या पिढ्यानपिढ्या पुढे गेल्या आहेत. मात्र तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही या शिवसेनेचे एका क्षणात तोन तुकडे केले आहेत,” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा >>> जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर रोहित पवार आक्रमक, म्हणाले “…तर ती आश्चर्याची बाब आहे”

“तुम्ही गेले असाल आणि वेगळा पक्ष स्थापन केला असेल तर हरकत नाही. त्याबाबतीत मी राज ठाकरे यांना मानतो. मी नारायण राणे यांचेही मी कौतुक केलेले आहे. त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. पुढे ते एका मोठ्या पक्षात सामील झाले. मात्र ही शिवसेना माझीच. ही शिवसेना मी संपवणार, हा विचार चुकीचा आहे. हा विचार मराठी माणसाचा घात करणारा आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“बंडखोरी केलेल्यांमधील काही लोक नक्कीच परत फिरतील. माझ्या मनात सर्वांविषयीच ओलावा आहे. एकनाथ शिंदे किंवा बाकीचे इतर लोक हे सगळे आमचे सहकारी आणि मित्र होते,” असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.Source link

Leave a Reply