Headlines

खामगावात पोळा सणाला गालबोट; बैलाला लाथ मारल्याच्या कारणावरुन दोन समाजामध्ये तुफान राडा

[ad_1]

राज्यभरात बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, बुलढाण्यातील खामगाव येथे या सणाला गालबोट लागले. बैलाला लाथ मारल्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्थानकात ६० ते ७० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- “काय ते मंत्री..काय त्यांचे नाव..काय त्यांचा…”, अमोल मिटकरींचं खोचक ट्वीट, तानाजी सावंतांना टोला!

बैलाला लाथ मारली म्हणून दोन समाजामध्ये तुफान राडा

खामगाव येथील फरशी भागात शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोळा भरवण्याची जुनी प्रथा आहे. सायंकाळी साडेसहा वाजता श्रीमंत शिवाजीराव देशमुख यांच्या मानाच्या बैलजोडीचे पूजन करण्यात आले. पोळ्यासाठी जमलेल्या बैलजोडी घराकडे जात असताना एका समाजाील मुलाने बैलाला लाथ मारली होती. त्यामुळे दुसऱ्या समाजातील काही मुलांनी त्यास मारहाण केली. हे प्रकरण एवढं वाढले की दोन्ही समाजातील मुलांनी एकमेंकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा- उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

परिसरात तणावाचे वातावरण

दगडफेकीनंतर परिसरातील काही वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. तसेच रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या दुचाकी रस्त्यावर आडव्या टाकून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या प्रकारामुळे सुटाळपुरा, बोरीपुरा शितला माता मंदिराजवळ काही काळ तणाव निर्माण झाला होता.या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी दगडफेक करणाऱ्या ६० ते ७० जणांविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *