KBC 14 मध्ये कोल्हापूरच्या महिलेचा ठसका… 1 कोटी रुपये जिंकणारी पहिली स्पर्धक


KBC 14 First Episode: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा सर्वात लोकप्रिय ठरलेला शो ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमधून अनेक स्पर्धकांची स्वप्न पुर्ण झाली आहेत. तसेच या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांना अमिताभ बच्चन यांच्याशी मनमोकळ्या गप्पा गोष्टी करण्याची संधीही मिळते. (popular television show kaun banega crorepati season 14 gets first winner winning 1 crore kavita chawla from kolhapur)

‘कौन बनेगा करोडपती 14’ ला पहिला करोडपती मिळाला आहे आणि अभिमानाची बाब म्हणजे एक करोड रूपये जिंकणाऱ्या या स्पर्धक महाराष्ट्रातल्या आहेत. कोल्हापूरहून आलेल्या गृहिणी कविता चावला (Kavita Chawla) यांनी एक कोटी रुपयांची रक्कम जिंकली आहे. नुकताच या शोचा नवा प्रोमोही रिलिज झाला आहे. 

या प्रोमोत कविता चावला 1 कोटी रूपये जिंकताना दिसल्या आणि अमिताभ बच्चन जेव्हा त्या 1 कोटी रूपये जिंकल्याची घोषणा करतात तेव्हा कविता यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. 

अमिताभ बच्चन यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ने (Bramhastra) पहिल्या आठवड्यात 173 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट सेकेंड वीकेंडमध्ये 200 कोटींचा टप्पाही पार करेल असा विश्वास तज्ञांना आहे. या चित्रपटात रणबीर कपूरने मुख्य भूमिका साकारली असून चित्रपटात आलिया भट्ट, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

अमिताभ बच्चन लवकरच ‘गुडबाय’ (Goodbye) या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा कौंटूबिक आहे. या चित्रपटात बिग बींसोबत नीना गुप्ता, रश्मिका मंदान्ना आणि पावेल गुलाटी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

बीग बी अमिताभ बच्चन हे अभिनयातले देव मानले जातात. त्यांच्या अभिनयाचा आदर्श आजही अनेक तरूण कलाकार घेताना दिसतात. किंबहूना बीग बींचे चित्रपट आजही तितकेच लोकप्रिय आहेत आणि आजही तरूण पिढीही आनंदानं त्यांचे चित्रपट पाहते. त्याच्या डायलॉग्जची जादू आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.   Source link

Leave a Reply