काय म्हणता…? 150 जणींना नकार देणारा, 3 प्रेयसी असणारा ‘हा’ बॉलिवूड सेलिब्रिटी आज मात्र सिंगलच


मुंबई : असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गातूनच बांधलेल्या असतात. पण, एका सेलिब्रिटीच्या बाबतीत असं काही झालेलं नाही. ज्यामुळं आता त्यानं लग्नाच्या गाठी बांधण्यासाठी अर्थात जोडीदाराचा शोध घेण्यासाठी एका रिअॅलिटी शोचा आधार घेतला आहे. 

प्रेमाच्या बाबतीत या सेलिब्रिटीला अपेक्षित यश मिळालं नाही, सांगून आल्या स्थळांपैकी काही त्याला रुचल्या नाहीत, तर काहींना तो. सरतेशेवटी आता त्यानं रिअॅलिटी शोच्या माध्यमातून जोडीदाराचा शोध घेण्याचं ठरवलं. 

पैसा, प्रसिद्धी सर्वकाही असताना प्रेमानं मात्र कायमच चकवा दिलेला हा सेलिब्रिटी आहे गायक मिका सिंग. (Mika Singh)

 ‘स्वयंवर- मीका दी वोहटी’ (Swayamvar-Mika Di Vohti) या कार्यक्रमातून मिका त्याची जोडीदार निवडणार आहे. जीवनाच्या या टप्प्यात लग्न करण्याची सुयोग्य वेळ असल्याचं त्याचं मत आहे. 

150 मुलींना नकार… 
गेल्या 20 वर्षांमध्ये मला जवळपास 100- 150 स्थळं सांगून आली. पण, त्यावेळी माझ्यासाठी माझं काम जास्त महत्त्वाचं होतं. पण, लोकांना वाटत होतं की मजामस्तीचं आयुष्य जगण्यासाठी मी असं काही करत नाहीये. 

मुळात तसं नव्हतं, असं सांगत त्यानं एका मुलाखतीत ही गोष्ट स्पष्ट केली. 

याआधी कोणाच्या प्रेमात होता मिका? 
एक काळ असाही होता जेव्हा मिका कोणा खास व्यक्तीच्या प्रेमात होता. 20 वर्षांपूर्वीच्या आपल्या प्रेमाच्या या नात्याची आठवण मिकानं या मुलाखतीत काढली. 

‘2001 मध्ये माझी एक प्रेयसी होती. ती दिल्लीची होती. तिची आई म्हणायची, बॉलिवूड हे असंच असतं… सोड हे… पुढे माझ्या संघर्षाच्या दिवसांमध्येही एकीनं माझी साथ दिली. मी मोठा सेलिब्रिटी होईन हे तिला सांगितलं होतं. 

तेव्हा तो जेव्हा सेलिब्रिटी होईल तेव्हाचं तेव्हा बघू, असं तिच्या घरातल्यांनी सांगितलं. माझ्या 2-3 सेलिब्रिटी होत्या आणि त्या तिघींच्याही लग्नात मी हजेरी लावली होती. कारण, त्यांच्या पालकांना काय वाटतं हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. कोणतीही मुलगी तिच्या पालकांपासून दूर व्हावी अशी माझी मुळीच इच्छा नव्हती’, असं मिका म्हणाला. 

प्रेमाच्या बाबतीत कायम अपयशानेच शेवट होणाऱ्या मिकाच्या या नव्या कहाणीचा शेवट आता खरंच कोणाच्या येण्यानं गोड होतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.Source link

Leave a Reply