कतरिना कैफची धुळवड कोणी बनवली भारी, हातात हात आणि…


मुंबई : चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या जगात या वर्षी असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे लग्नानंतरची पहिली होळी आणि रंगपंचमीचा सण साजरा करत आहेत.

गेल्या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली. यंदा ते त्यांच्या लाईफ पार्टनरसोबत पहिली होळी साजरी करत आहेत. या यादीत कतरिना आणि विकी कौशलचेही नाव आहे.

पण लग्नानंतरच्या पहिल्या रंगपंचमीला कतरिनासोबत जे घडलं आहे. त्याचा कुणी विचारही केला नसेल असं बोललं जात आहे.

तिचा हा विकीच्या कुटुंबियांसोबतचा पहिला अनुभव आहे. आणि तो कतरिनासाठी फारच वेगळा ठरला आहे.तिचे कुटुंबासोबतचे काही फोटो समोर आले आहेत.

 विकी आणि कतरिना यांचा विवाह 9 डिसेंबर 2021 रोजी झाला आणि लग्नानंतर दोघांची ही पहिली होळी आहे. अशा परिस्थितीत दोघेही त्यांची होळी कशी साजरी करणार हे जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक होते.

आता चाहत्यांसोबत या जोडीने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या सासरच्या घरी होळी साजरी करताना दिसत आहे.

या फोटोत विकीची हॅप्पी फॅमिली दिसत आहे. दोघांनी आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये विकी सेल्फी घेत आहे तर कतरिना तिच्या सासूसोबत उभी आहे. कतरिनाची ही होळी विकीच्या घरच्यांनी आणखीनच खास बनवल्याचं दिसून येत आहे.

सोबतच वडील शाम कौशल आणि भाऊ सनी कौशल देखील पोज देताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 कतरिनाचं विकीच्या कुटुंबासोबतच बॉण्डिंग अनेकांना चकीत करणार ठरत आहे. सगळ्यांसाठीच हे फोटो आश्चर्याचा धक्का देणारे ठरत आहेत.Source link

Leave a Reply