Headlines

कारमध्ये बसून Baby Bump लपवताना दिसली Alia Bhatt, फोटो व्हायरल

[ad_1]

Alia Bhatt Baby Bamp: आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ब्रम्हास्त्र (Bramhastra) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे तर दुसरीकडे काहींची या चित्रपटानं नाराजीही केली आहे. (alia bhatt tries to hide her baby bump she gets spotted while sitting in the car photos goes viral)

आलिया भट्ट तिच्या बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ (Bramhastra) चित्रपटामुळे चर्चेत असतानाच ती तिच्या प्रेग्नेंसीमुळेही सध्या चर्चेत आहे. आलिया आणि रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन चांगले आहे. प्रदर्शनाआधी या चित्रपटाला बॉयकॉटचाही सामना करावा लागला होता.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आलिया नुकतीच खार येथील धर्मा प्रोडक्शन कार्यालयाबाहेर स्पॉट झाली. समोर आलेल्या फोटोंमध्ये आलिया कारमध्ये काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. या फोटोंमध्ये आलिया तिचा बेबी बंप लपवताना दिसत होती. आलियाच्या कारमधील हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये आलिया भट्ट ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. आलियानं लाईट मेकअपसह गोल्डन कलरचे कानातले घातले होते. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

या फोटोंमध्ये आलिया गाडीच्या आत अशा प्रकारे बसलेली दिसली की तिचा बेबी बंप कॅमेऱ्यात कैद होणार नाही. या फोटोंमध्ये आलिया खूप आनंदी दिसत होती.

धर्मा प्रॉडक्शनच्या कार्यालयातून बाहेर पडताच पापाराझींनी आलियाला घेरले. समोर आलेल्या काही फोटोंमध्ये अभिनेत्री गाडीची काच उघडताना दिसली तर काही फोटोंमध्ये आरसा वरच्या बाजूने दिसत होता.

गरोदरपणातही आलिया ‘ब्रह्मास्त्र’चे सतत प्रमोशन करताना दिसली होती. कधी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया दिल्लीत पोहोचली तर कधी हैदराबाद. हे लेटेस्ट फोटो पाहून असे म्हणता येईल की आलिया प्रेग्नेंसीच्या काळातही खूप बिझी असते.

आलिया आणि रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर सोशल मीडियावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. या चित्रपटाशी संबंधित अनेक स्टार्सही पुढे आले आणि त्यांनीही या चित्रपटावर बहिष्कार टाकू नये अशी मागणी केली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *