कपिल तू सगळं खरं बोलायला हवं होतंस…. अनुपम खेर यांनी कपिलवर साधला निशाणा


मुंबई : द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) आणि टीव्हीचा लोकप्रिय कॉमेडी शो  द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) यांच्यातील वाद शांत व्हायचं काही नाव घेत नाही. कपिल शर्माने ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाला आपल्या कार्यक्रमात प्रमोट करण्यास नकार दिला का? आता हा देशातील सर्वात मोठा विषय बनला आहे. चाहत्यांना देखील याची उत्सुकता आहे. 

सोमवारी कपिल शर्माने एका मुलाखतीची क्लिप शेअर करून अनुपम खेर यांचे आभार मानले. कपिलने मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले- धन्यवाद पाजी अनुपम खेर. माझ्या विरोधात असलेल्या सगळ्या आरोपांबाबत असलेले गैरसमज दूर करावेत. आणि त्या सगळ्या मित्रांकरता धन्यवाद, ज्यांनी माहिती पूर्ण न मिळवता एवढं प्रेम केलं. खुश राहा, आनंदात राहा… 

कपिलची पोस्ट आणि अनुपम खेर यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर कॉमेडिअनला प्रेक्षकांनी क्लिन चीट दिली. आता गोष्टीत नवं ट्विस्ट आल्याचं दिसत आहे. 

अनुपम खेर यांनी कपिलचं ट्विट रिट्वीट करताना लिहिलं, प्रेमळ कपिल… अर्ध सत्य समोर न मांडता जर तू पूर्ण व्हिडीओ पोस्ट केला असतास? संपूर्ण जग सेलिब्रेट करत आहे. काल रात्री तू देखील केलंस. प्रेम आणि प्रार्थना…. 

अनुपम खेर यांच्यापोस्टवरून असं समजत आहे की, कपिलने स्वतःची चांगली बाजू मांडताना अनुपम खेर यांच अर्धवट सत्य समोर मांडलं आहे. कारण कश्मीर फाइल्स सिनेमाच्या प्रमोशनकरता सत्य काही वेगळंच होतं. 

कपिलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनुपम खेर म्हणतात – खरे सांगायचे तर मला द कपिल शर्मा शोसाठी कॉल आला होता, पण मी माझ्या मॅनेजरला सांगितले की, हा खूप मोठा सिनेमा आहे. मी या कार्यक्रमात जाऊ शकत नाही. मी या सिनेमाच्या माध्यमातून माझ्या मनातील भावना व्यक्त करत आहे. कपिल शर्मा शो हा कॉमेडी शो आहे. कॉमेडी शो करणे कठीण आहे.Source link

Leave a Reply