Jyotish Upay: तुमचं खराब नशीब उजळवतील पितळेची भांडी; आजच करा हे काम!


Brass Utensils Benefit: पैसा, वैभव आणि सुख समृद्धी कोणाला नको असते. हे मिळवण्यासाठी व्यक्ती प्रचंड मेहनतही करतो. मात्र अनेकदा दुर्भाग्यामुळे असं होणं शक्य होतं नाही. यासाठी नशीबाने तुम्हाला साथ देणं गरजेचं असतं. तुम्हाला कल्पना आहे का, व्यक्तीला मेहनीच फळ मिळत नाही यामागे घरातील भांडीही जबाबदार असू शकतात. यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. 

एखाद्या व्यक्तीचे नशीब पितळेच्या भांड्यांशी संबंधित असू शकतं. या धातूच्या भांड्याने काही उपाय केल्यास नशीब तुमची साथ देतं.

सौभाग्य

सौभाग्य प्राप्तीसाठी पितळेच्या कलशमध्ये हरभरा डाळ ठेवा आणि भगवान विष्णूला अर्पण करा. असं केल्याने, दुर्दैव तुमची पाठ सोडण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकतात.

दुर्भाग्य

तांदळाच्या एका भांड्यामध्ये दही भरून पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. असं केल्याने नशिबाची साथ मिळू शकते.  अशुभामुळे तुमचं काम बिघडत असेल तर हा उपाय केल्यास सर्व कामं पूर्ण होतील.

वैभव लक्ष्मीचं व्रत

धन-समृद्धी हवी असेल तर शुक्रवारी वैभव लक्ष्मीचे व्रत करावं. या वेळी पूजा करताना पितळेच्या दिव्यामध्ये तुपाचा दिवा लावून आरती करा. असं केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते आणि घरामध्ये सदैव कृपा नांदते.

आर्थिक स्थिती

अधिक करूनही घरची आर्थिक स्थिती चांगली नाहीये का? तर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तर पितळेच्या कलशात तूप ठेवा आणि पौर्णिमेच्या दिवशी श्रीकृष्णाला अर्पण करा. हा कलश एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा. असं केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतील तसंच आर्थिक स्थिती मजबूत होईल.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)Source link

Leave a Reply