Headlines

ज्याच्या गाण्यांनी प्रेम करायला शिकवलं त्याच लकी अलीची अवस्था पाहून तुम्हालाही रडू येईल

[ad_1]

मुंबई : हिंदी कलाजगतामध्ये 60 आणि 70 चं दशक गाजवणाऱ्या अभिनेता मेहमूद यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी स्थान मिळवलं. त्यांच्या मुलानं म्हणजेच गायक लकी अली यानं अभिनयावाटे नाही, तर आपल्या गायनावाटे चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. (Lucky ali songs)

लकी अलीनं त्याचा गाण्याच्या माध्यमातून एका पिढीला प्रेम करायला शिकवलं, ते जगायला शिकवलं. किंबहुना आजही त्यानं गायलेली गाणी अनेकांच्याच प्लेलिस्टचा भाग आहे. इथं लकी अली आणि त्याची गाणी कधीही मागं पडत नसतानाच तिथे या गायकाच्या आयुष्यात मात्र अशी काही वळणं आली ज्यामुळं तो बराच मागे पडला. (Lucky Ali )

आजच्या घडीला तो मुंबईत नाही, वडिलांच्या निधनानंतर लकीनं बंगळुरूची वाट धरली. आई- वडिलांनी सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तो तिथं गेला. एकेकेळी मुंबई मनात ठसलेली असतानाच वडिलांच्या निधनानंतर मात्र लकी अलीला याच शहरातला भकासपणा सतावू लागला. (Lucky ali father )

एका मुलाखतीदरम्यान, तो प्रसंग सांगताना लकी म्हणाला ‘मी एकाच ठिकाणी राहणाऱ्यांपैकी नाही. मला फिरत राहण्याची, नव्या ठिकाणी जाण्याची गरज वाटत राहते. नाहीतर मला आपण, नष्ट होत असल्याची जाणीव होते. वडिलांचं निधन झालं, तेव्हा मला असं वाटलं की आता मला या शहरातून म्हणजेच मुंबईतून निघायचं आहे. (Bollywood singer lucky ali once wanted to leave mumbai post father mehmood death )

माझं या शहराशी काही नातंच नाही, असं मला वाटत होतं. इतक्या गर्दीतही मला एकटंच वाटत होतं, भकास वाटत होतं. इथं मी बऱ्याच लोकांना ओळखूनही मी स्वत: अनोळखी असल्याचं जाणवंत होतं.’ 

लकीला फक्त मुंबईतच असं वाटलं तर तसं नाही; बंगळुरूमध्ये असतानाही त्याला असंच वाटत होतं. मुंबईपासून लकी अली दुरावला असला तरीही बंगळुरूमध्ये जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना या शहराला तो विसरलेला नाही. 

इथं आल्यावर समुद्र पाहणं, जिथं आपण लहानाचे मोठे झालो त्या ठिकाणांना भेट देणं हे सर्वकाही आठवून त्या आठवणींवर मनसोक्त प्रेम करत लकी अली या शहरालाही जगतो असं म्हणायला हरकत नाही. 

एक प्रसिद्धीझोतात असणारा गायक त्याच्या खासगी आयुष्यातील चढ- ऊतारांमुळे इतका खचतो की, त्याचा इतक्या गर्दीतही एकटं वाटतं … ही बाब डोळ्यात पाणी आणते नाही का? 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *