ज्या घरात अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी अंत, ते घर कोण घेणार भाड्यानं?


मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक थरारक किस्से आहेत, जे  अत्यंत हृदयद्रावक आहेत. अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या काही घटना आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. कलाकार चाहत्यांच्या मनावर राज्य करून अशा ठिकाणी गायब होतात, की नंतर फक्त आणि फक्त त्यांच्या आठवणी मागे राहतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री परवीन बाबी (Parveen Babi). परवीन यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. ज्या घरात परवीन यांचं निधन झालं, ते विक्रीसाठी किंवा भाड्याने उपलब्ध आहे..  (Parveen Babi death)

परवीन बाबी यांचं खासगी आयुष्य (Parveen Babi personal life)
परवीन बाबी यांनी आयुष्यात पैसा प्रसिद्धी स्वतःचा बळावर कमावली, पण त्यांचं खासगी आयुष्य मात्र प्रचंड विखुरलेलं होतं. शेवटच्या क्षणीही परवीन एकट्याचं होत्या. इतक्या एकट्या की निधनानंतरही त्यांच्या निधनाची माहिती कोणाला नव्हती.  (Parveen Babi relationship)

तब्बल तीन दिवसांनंतर त्यांच्या निधनाची माहिती मिळाली आणि फक्त भारतातच नाही तर, संपूर्ण जगात खळबळ माजली. करिश्मा उपाध्याय लिखित पुस्तकात लिहिले आहे की, परवीन आयुष्याच्या शेवटच्या काळात दूध आणि अंडी खाऊन जगत होत्या. कारण त्यांना भीती होती की कोणीतरी त्यांना विष पाजाणार आहे.

परवीन बाबी यांचं प्रोफेशनल आयुष्य यशस्वी होतं. पण त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक उतार चढाव आले. परवीन बाबी यांच्या जीवनाची अखेर अतिशय हृदयद्रावक पद्धतीनं झाली. संशयास्पद अवस्थेत या अभिनेत्रीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला होता.  (Parveen Babi was found dead in her apartment )

सोसायटीच्या सुरक्षा रक्षकानं जेव्हा त्यांच्या घराबाहेर दोन दिवसांपूर्वीचं दूध आणि पेपर पाहिले तेव्हा पोलिसांना याची माहिती दिली. परवीन यांच्या जीवनात हे वळण आलेलं असताना कोणीही त्यांच्यासोबत नव्हतं. वैयक्तिक आयुष्यात या अभिनेत्रीला कायम निराशेचाच सामना करावा लागला. 

अभिनेत्री घर विक्रीसाठी किंवा भाड्याने उपलब्ध आहे.
परवीन बाबी यांचा फ्लॅट मुंबईच्या अतिशय सुंदर ठिकाणी आहे. जुहू बीचवरील फ्लॅटमधून समुद्र दिसतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परवीन बाबी यांचा फ्लॅट विक्रीसाठी किंवा भाड्याने उपलब्ध आहे. सातव्या मजल्यावर असलेला हा टेरेस फ्लॅट आहे.  (Actress house is available for sale or rent)

ज्या घरात परवीन यांचं निधन झालं त्या फ्लॅटची विक्रीची  किंमत 15 कोटी रुपये आहे. तर भाड्याने देखील फ्लॅट उपलब्ध असणार आहे. यासाठी 4 लाख रुपये भाडं असेल. 

 

 Source link

Leave a Reply