विश्लेषण : गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाड राजीनामा देण्याच्या तयारीत, पण कलम ३५४ नेमकं आहे तरी काय? | jitendra awhad said giving resignation of mla post know what is ipc section 354 in which awhad is bookedराष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. याबाबतची माहिती आव्हाड यांनी ट्वीटद्वारे आज (१४ नोव्हेंबर) सकाळीच दिली आहे. काल (१३ नोव्हेंबर) त्यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कारणामुळे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करत आव्हाड यांनी आमदराकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ज्या कलम ३५४ अंतर्गत आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते नेमकं काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

हेही वाचा >>> विश्लेषण : केरळ, तेलंगाणा, तामिळनाडूमध्ये राज्यपाल-सरकार वाद; राज्यपालांची नियुक्ती कोण करतं? अधिकार काय?

आव्हाड यांच्यावर महिलेने काय आरोप केले?

मागील काही दिवसांपासून आव्हाड वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या चित्रपटाचे काही शो बंद पाडले होते. त्यांनतर आव्हाड यांच्याविरोधात ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर काल कळवा येथील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याबाबत आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

महिलेने तक्रारीत काय म्हटलंय?

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, वाय जंक्शन येथे रविवारी रात्री एमएमआरडीएने बांधलेल्या एका पुलाचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकार्पण कार्यक्रमास आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील उपस्थित होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीत बसून जात असताना महिला त्यांना भेटण्यासाठी जात होती. त्याचवेळी आव्हाड हे समोरून येत होते. त्यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने दोन्ही खांद्यास दाबून काय उभी आहे, बाजूला हो असे म्हणत ढकलले, असे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर आव्हाड यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) ३५४ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : भाजपाच्या लोकांकडून आमदारांना लाच? कथित ‘डील’च्या व्हिडीओने खळबळ, चंद्रशेखर राव यांचे आरोप काय?

कलम ३५४ काय आहे?

भारतीय दंड विधानातील ३५४ हे कलम विनयभंग तसेच लैंगिक छळवनुकीशी संबंधित आहे. या कलमांतर्गत गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार एक ते तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. एखादी व्यक्ती शारीरिक जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल. किंवा लैंगिक संबंधाची मागणी करत असेल. महिलेच्या इच्छेविरुद्ध पॉर्नोग्राफिक व्हिडीओ दाखवत असेल, तर त्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा दिली जाऊ शकते. किंवा त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसेच शिक्षा आणि दंडात्मक कारवाई अशा दोन्हींची तरतूद या कलमांतर्गत करण्यात आलेली आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण : शेतात अंशत: जाळणी म्हणजे काय? त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण कमी होणार?

याच कलमांतर्गत एखाद्या व्यक्तीने लैंगिकतेवर आधारीत शेरेबाजी केल्यास तिला लैंगिक छळाच्या आरोपाखाली एका वर्षाचा कारावास किंवा दंड भरण्याची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. तसेच महिलेविषयी लैंगिक शेरेबाजी केल्याच्या गुन्ह्याखाली शिक्षा आणि दंडात्मक कारवाई अशा दोन्हींची तरतूद या कलामामध्ये आहे.Source link

Leave a Reply