Headlines

जेव्हा करणनं कार्तिकला दाखवली ऐपत; राजकुमारी साराला डेट करण्यावरून रंगलं शाब्दिक युद्ध

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड वर्तुळात येणाऱ्या प्रत्येक दिवशी कलाकारांची नावं एकमेकांशी जोडली जातात. म्हणजे कलाकारांनी कोणाचं कौतुक केलं, ते एकमेकांशी चांगलंही बोलले तरीसुद्धा हे नाव जोडण्याचं प्रकरण तिथंही डोकावतं. 

मागच्या बऱ्याच दिवसांपासून या कलाजगतामध्ये असंच एक प्रकरण जबरदस्त चर्चेत आलं आहे. इथं एका राजकुमारीचं नाव एका नवख्या पण तरीही यशस्वी अभिनेत्याशी जोडलं जात आहे. (Bollywood Karan Johar on Kartik Aryan and sara ali khan link ups)

ही राजकुमारी म्हणजे पतौडी या शाही कुटुंबातील लेक, अभिनेत्री सारा अली खान आणि हा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. खुद्द सारानंच निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या चॅट शोवर आलं असता, कार्तिकविषयीच्या तिच्या मनातील भावना बोलून दाखवल्या होत्या. तेव्हा तिथं तिचे वडिल सैफ अली खानचीही हजेरी होती. 

प्रेम वगैरे व्यक्त करणं दूर, सारानं फक्त कार्तिकवर क्रश असल्याचं सांगितलं होतं. त्याच्या कामानं आपण प्रभावित असल्याचंही ती म्हणाली होती. बस्स, तेव्हापासून त्यांच्या नात्याला वाव मिळाला. 

सारानं कार्तिकवरील वक्तव्य़ करताच तिथं असणाऱ्या सैफनं लेकिचं बोलणं ऐकून “money money” अशी कमेंटही केली होती. यानंतर जेव्हा कार्तिक करणच्या कार्यक्रमात आला तेव्हा पुन्हा एकदा त्याला साराच्या वक्तव्याचा संदर्भ करणनं दिला. साराला केव्हा डेटवर नेणार ? असं विचारलं असता, कार्तिकनं त्याला सैफच्या कमेंटची आठवण करुन दिली होती. 

आपल्याकडे पुरेसे पैसे आहेत की नाही, अशी कमेंट सैफ अली खाननं केली असल्याची आठवण कार्तिकनं करुन दिली. त्याला लगेच तिथेच टोकत करणनं म्हटलेलं, ‘…आणि पतौडीच्या राजकुमारीशी बरोबरी करण्यासाठी तुझा प्रश्नच नाही.’

करणनं जाहीरपणे आपली ऐपत काढल्याचं पाहून कार्तिकनं तेव्हा लगेचच त्याला अतिशय शांतपणे उत्तर देत म्हटलेलं, ‘ती राजकुमारी आहे, अर्थातच तिला बाहेर नेण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे हवेत’. काहीही न बोलता यावेळी कार्तिक बरंच काही बोलून गेला होता. 

करण आणि कार्तिकच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यांचा हा भूतकाळातील प्रसंग याच वादाची ठिणगी कुठून पडली, याकडे खुणावतो. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *