Ishaan Kishan: “मला ती चूक करायची नाही…”, पहिल्यांदाच टेस्ट खेळणाऱ्या ईशानने ठेवलं वर्मावर बोट!


Ishaan Kishan with shubhman gill: बांग्लादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय सलामीवीर ईशान किशनने (Ishaan Kishan) इतिहास रचला होता. ईशानने या सामन्यात 210 धावांची तुफानी खेळी (ishan kishan double century) केली आणि तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद डबल सेंच्युरी झळकावणारा फलंदाज बनला. त्यानंतर मात्र, ईशानला डावलण्यात आल्याचं दिसून येतंय. अशातच आता ईशानला टेस्टमध्ये (IND vs AUS) संधी देण्यात आली आहे. (ishan kishan open up first time after maiden test call up share his emotion with shubhman gill marathi news)

काही दिवसांपूर्वी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. या संघात इशान किशनच्या नावाचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्याचबरोबर विकेटकिपर केएस भरतचाही (KS Bharat) या संघात समावेश होता. त्यामुळे आता दोन्हीपैकी कोणाला खेळवण्यात येणार?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

काय म्हणाला Ishaan Kishan?

भारताचा सलामीवीर शुभमन गिलने ईशान किशनचा इंटरव्ह्यू (Ishaan Kishan with shubhman gill) घेतला. अपनी बातमध्ये बोलताना ईशान किशनने पहिला कसोटी सामना खेळण्याआधी एक मोठं वक्तव्य केलंय. माझे वडिल म्हणतात, टेस्ट क्रिकेट म्हणजेच खरं क्रिकेट आहे. पहिल्यांदा टेस्ट स्कॉडमध्ये समावेश झाल्याने मला आनंद होतोय, असं ईशान म्हणाला आहे. 

आणखी वाचा – रणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना; स्विंगने उडवली दाणादाण

ईशान किशनला शुबमन गिलने विचारलं की, वनडे आणि टी-ट्वेंटी प्रमाणेच तु कसोटीतही फोर मारून मालिकेत सुरूवात करणारे का?, तेव्हा ईशान किशनने हसून उत्तर दिलं. ईशान म्हणाला, मी तरुण खेळाडूंसारखं वागणार नाही, कारण कसोटी क्रिकेट वेगळं आहे. परिस्थितीनुसार फलंदाजी करावी लागेल, असं ईशान म्हणाला. टेस्ट क्रिकेटमध्ये (Test Cricket) नवे खेळाडू आक्रमक खेळ दाखवतात. त्यामुळे अनेकदा त्याचा तोटा भारताला झाल्याचं दिसतं. याच जखमेवर बोट ठेऊन ईशानने जखमेवरची खपली काढली आहे.Source link

Leave a Reply