आयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, चेन्नई विरुद्ध मुंबईत कडवी झुंज


मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातला (IPL 2022) 59 वा सामना आज (12 मे) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) पार पडणार आहे. (ipl 2022 csk vs mi chennai super kings vs mumbai indians preview)

चेन्नईसाठी हा ‘करा यो मरो’चा सामना आहे. प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी चेन्नईला मुंबई विरुद्धचा हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणं बंधनकारक असणार आहे. तर मुंबई याआधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.

चेन्नईने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 11 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 7 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. तर 3 सामने  खेळायचे आहेत.

चेन्नईने या 3 पैकी एकही सामन्यात पराभूत झाली, तर प्लेऑफचं असलेलं जर तरचं आव्हान संपेल. चेन्नई सध्या पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे. तर मुंबई 11 पैकी केवळ 2 सामने जिंकून 10 व्या क्रमांकावर कायम आहे. 

मुंबई बदला घेणार?

मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात खेळवण्यात आलेल्या मागील 5 सामन्यात चेन्नई वरचढ राहिली आहे. चेन्नईने 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबईला 2 सामन्यात विजय मिळवता आला आहे. 

चेन्नईने मागील 2 सामन्यात सलग पराभूत केलंय. त्यामुळे मुंबईचा चेन्नईला पराभूत करुन पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे.

दोन्ही टीमची  संभावित प्लेइंग इलेव्हन :

चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉन्वे, मोईन अली, रोबिन उथप्पा, शिवम दुबे, अंबाती रायुडू, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार/विकेटकीपर), ड्वेन ब्रावो, सिमरजीत सिंह, महेश तीक्ष्णा आणि मुकेश चौधरी.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, ट्रिस्टन स्टब्स/रमनदीप सिंह, टीम डेविड, कायरन पोलार्ड, डेनियल सॅम्स, ऋतिक शौकीन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह आणि बासिल थम्पी/रिले मेरेडिथ.Source link

Leave a Reply