Headlines

IPL 2023 : पोलार्ड रिलीज, शार्दुल ठाकूर ‘या’ टीममध्ये, आयपीएल 2023 मधील आतापर्यंतचे सर्वात मोठे अपडेट्स

[ad_1]

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 16 व्या हंगामासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. आयपीएल 2023 साठी कोचिमध्ये मिनी लिलाव (Mini Auction) होण्याची शक्यता आहे. या लिलावाआधी बीसीसीआयने (BCCI) सर्व दहा संघांना रिटेंशन (Retention) आणि रिलीज (Release) केलेल्या खेळाडूंची यादी देण्याची सूचना केली आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व दहा संघांना खेळाडूंची यादी द्यायची आहे.  सर्व दहा संघाच्या खेळाडूंची जवळपास स्पष्ट झाली आहे. यात काही खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात आलं आहे, तर काही खेळाडूंना रिलीज केलं आहे. 

मुंबई इंडियन्स (MI)
मुंबई इंडियन्सने एक अनपेक्षित निर्णय घेतला आहे. पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबईने धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्डला रिलीज केलं आहे. याशिवाय टाइमल मिल्स, मयंक मार्कंडे आणि ऋतिक शौकीन या खेळाडूंनाही टीमने कायम ठेवलेलं नाही. इतर महत्वाचे खेळाडू मात्र संघासोबत सोळाव्या हंगामातही दिसणार आहेत.

टॉप रिटेंशन  खेळाडू : रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, डेनियल सॅम्स, टिम डेविड, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रिस्टन स्टब्स आणि तिलक वर्मा

रिलीज खेळाडू : फॅबियन एलेन, कायरन पोलार्ड, टाइमल मिल्स, मयंक मार्कंडे आणि ऋतिक शौकीन

चेन्नई सुपर किंग्स (CSK)
टॉप रिटेंशन खेळाडू : महेंद्र सिंह धोणी, रवींद्र जडेजा, मोईन अली, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉन्वे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस आणि  दीपक चाहर

रिलीज खेळाडू : क्रिस जॉर्डन, अॅडम मिल्ने, नारायण जगदीशन आणि मिचेल सेंटनर.

3. कोलकाता नाइट राइडर्स (KKR) 
कोलकाता नाईट रायडर्सने नव्या हंगामासाठी शार्दुल ठाकूरसह लॉकी फर्ग्युसूनला आपल्या संघात घेतलं आहे. 

टॉप रिटेंशन खेळाडू:  श्रेयस अय्यर, सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरूण चक्रवर्ती, पॅट कमिंस, नीतीश राणा, शेल्डन जॅक्सन, रिंकू सिंह, उमेश यादव

रिलीज खेळाडू : शिवम मावी, मोहम्मद नबी, चामिका करुणारत्ने, रमेश कुमार, अजिंक्य रहाणे, एरॉन फिंच

रॉयल चैलेंजर्स बंगळुरु (RCB)

टॉप रिटेंशन खेळाडू : विराट कोहली, फाफ डु प्लेसी, वानिंदु हसारंगा, दिनेश कार्तिक, मोहम्मद सिराज, हर्शल पटेल, शाहबाज अहमद, रजत पाटीदार.

रिलीज खेळाडू : सिद्धार्थ कौल, कर्ण शर्मा, डेविड विली, आकाश दीप

राजस्थान रॉयल्स (RR)
टॉप रिटेंशन खेळाडू : संजू सॅमसन, यशस्वी जायसवाल, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, जिमी नीशम, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मैकॉय.

रिलीज खेळाडू : नवदीप सैनी, डेरिल मिचेल, रस्सी वॅन डर डुसेन, कॉर्बिन बॉस

लखनऊ सुपर जायंट्स (LSG)- 
लखनऊ सुपर जायंटसच्या खेळाडूंबाबत अद्याप काही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार मनीष पांडे, अंकित राजपूत, अँड्र्यू टाय यांना संघात कायम ठेवण्यात येणार नाही.

पंजाब किंग्स ( PBKS)- 
पंजाब किंग्सनेही आपल्या खेळाडूंची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. पंजाबने शिखर धवनकडे कर्णधारपदाची धुरा दिली आहे. आता कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार आणि कोणत्या खेळाडूंना रिलीज करणार हे लवकरच स्पष्ट होईल.

गुजरात टाइटन्स (GT)

टॉप रिटेंशन खेळाडू : हार्दिक पंड्या, डेविड मिलर, शुभमन गिल, अभिनव मनोहर, ऋद्धिमान साहा, रहमानुल्लाह गुरबाज, राशिद खान, मोहम्मद शमी, राहुल तेवतिया, मॅथ्यू वेड.

रिलीज खेळाडू : विजय शंकर, गुरकीरत मान सिंह, जयंत यादव, प्रदीप सांगवान, नूर अहमद, साईं किशोर, वरुण एरॉन.

9. दिल्ली कॅपिटल्स (DC)- 
दिल्ली कॅपिटल्सने शार्दुल ठाकूरला रिलीज केलं आहे. त्यानंतर शार्दुल ठाकूरचा केकेआरमध्ये समावेश करण्यात आला आहे.

टॉप रिटेंशन खेळाडू : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, मिचेल मार्श, सरफराज खान, एनरिक नॉर्किया, कुलदीप यादव.

रिलीज प्लेयर खेळाडू : शार्दुल ठाकुर, टिम सिफर्ट, केएस भरत, मंदीप सिंह, अश्विन हेब्बर

सनराइजर्स हैदराबाद (SRH) 
केकेआरनेही आपल्या खेळाडूंची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार केन विल्यमन्सन आणि अब्दुल समदला रिलीज केलं जाऊ शकतं.

आयपीएल मिनी लिलावाची प्रत्येक अपडेट तुम्ही झी 24 तासच्या वेबसाईटवर पाहू शकता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *