IPL 2022, RR vs MI | सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी, मुंबईचा राजस्थानवर 5 विकेट्सने विजय


नवी मुंबई :  मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्माला बर्थडे गिफ्ट दिलं आहे. मुंबईने  आयपीएलच्या  15 व्या मोसमातील (IPL 2022) पहिला विजय मिळवला आहे. मुंबईने राजस्थान रॉयल्सवर 5 विकेट्सने विजय मात केली आहे. डॅनियल सॅम्सने विजयी सिक्स मारला.  राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 159 धावांचं आव्हान मुंबईने 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. (rr vs mi ipl 2022 mumbai indians win match by 5 wickets against rajsthan royals) 

मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. तिलक वर्माने 35 रन्सचं योगदान दिलं. इशान किशनने 26 धावा केल्या. तर टीम डेव्हिडने नॉट आऊट 20 रन्स केल्या. राजस्थानकडून रवीचंद्रन अश्विन युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, कुलदीप सेन आणि ट्रेन्ट बोल्टने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

राजस्थानची बॅटिंग 

दरम्यान त्याआधी मुंबईने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं.  राजस्थानने 20 ओव्हरमध्ये  6 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. राजस्थानकडून जॉस बटलरने  67 धावांची वादळी खेळी केली. रवीचंद्रन अश्विनने 21 रन्स केल्या. तर देवदत्त पडीक्कल, कॅप्टन संजू सॅमसन आणि डेरल मिचेल या तिघांनी अनुक्रमे 15, 16 आणि 17 धावा केल्या. 

तर मुंबईकडून हृतिक शौकीन आणि रिले मेरेडीथ या दोघांनी  प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.  तर डॅनियल सॅम्स आणि कुमार  कार्तिकेय या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

राजस्थानची प्लेइंग इलेव्हन :

संजू सॅमसन (कर्णधार), जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, डॅरिल मिचेल, रियान पराग, शिमरोन हेटमायर, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल आणि कुलदीप सेन. 

मुंबईची प्लेइंग इलेव्हन : 

रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, टिम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह आणि रिले मेरेडिथ.  Source link

Leave a Reply