Headlines

IPL 2022 | पृथ्वी शॉच्या प्रायव्हेट पार्टवर बॉलचा जोरदार फटका, मैदानातच कोसळला

[ad_1]

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2022) आज  गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी केली. दिल्लीच्या पृथ्वी शॉने क्रीझवर येताच झंझावाती फलंदाजी करत शानदार अर्धशतक झळकावलं. (ipl 2022 lsg vs delhi ball hit on opener batsman prithvi shaw private part)  

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) बॅटिंग करत असताना मोठी घटना घडली. पृथ्वीच्या प्रायव्हेट पार्टवर बॉल लागला. त्यानंतर पृथ्वी वेदनेने ओरडत जमिनीवर झोपला गेला.

नक्की काय झालं? 

लखनऊ सुपर जायंट्सचा अँड्र्यू टाय सामन्यातील सहावी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर चेंडू पृथ्वी शॉच्या प्रायव्हेट पार्टला लागला. यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या फिजिओला मैदानात यावं लागलं. काही काळ खेळ थांबवण्यात आला. 

त्यामुळे पृथ्वीला गंभीर इजा झालीये का, अशी भिती व्यक्त करण्यात आली. मात्र काही मिनिटांच्या व्यत्ययानंतर सामना पुन्हा सुरु झाला.  यानंतर पृथ्वी आऊट झाला. पृथ्वीने 34 बॉसमध्ये 9 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. 

दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, सरफराज खान, रोवमैन पावेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया आणि मुस्तफिजुर रहमान.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक, एविन लुइस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुड्डा, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर, एंड्रू टाय, रवि बिश्नोई आणि आवेश खान.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *