IPL 2022: ‘ऐसे कैसे DC’, पराभवानंतर गुजरात टायटन्सने दिल्लीला डिवचलं!


मुंबई : शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्या सामना रंगला होता. या सामन्यात गुजरातने दिल्लीचा दारूण पराभव केला. यंदाच्या सिझनमधील दिल्लीचा हा पहिला पराभव झाला. हा पराभवानंतर गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सला डिवचलं आहे. 

या विजयानंतर गुजरात टीमच्या सोशल मीडियावरून एक मीम शेअर करण्यात आला आहे. गुजरात टीमने सोशल मीडियावर बॉलिवूड लेजंड राजकपूर आणि अभिनेत्री वहिदा रहमान यांचा फोटो शेअर केलाय. यामध्ये ऐसे कैसे दिल्ली कॅपिटल्स?, असं लिहिण्यात आलं आहे.

गुजरातच्या पोस्टवर फॅन्सचं रिएक्शन

गुजरात टायटन्सने हे मीम शेअर करत कॅप्शनमध्ये, Batting first & winning?, असं लिहिलंय. दरम्यान गुजरातने हे मीम शेअर केल्यानंतर फॅन्सनेही त्याची मजा घेतली आहे. काही युझर्सने याला थेट राजकारणाशी जोडलं आहे.

एका युझरच्या म्हणण्याप्रमाणे, हे मोदीचं गुजरात आहे. तर दुसऱ्या एका युझरने लिहिलं आहे की, दिल्ली मोठ्या पाठिंब्याने गुजरात जिंकण्याचा प्रयत्न करतंय, मात्र परिणाम गुजरात टायटन्स आरामात विजयी झाली.

दिल्लीने गमावला सामना

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आव्हान दिलं. यावेळी प्रथम फलंदाजी करत गुजराने दिल्लीला 172 रन्सचं आव्हान दिलं. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला केवळ 157 रन्स करता आले आणि पंतच्या टीमचा पराभव झाला.Source link

Leave a Reply