IPL 2022: अर्धशतक ठोकणाऱ्या अश्विच्या पत्नीची रिअॅक्शन पाहून अख्खं स्टेडियम चक्रावलं


मुंबई : भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आपल्या फिरकीच्या जादूने फलंदाजांना चकवत त्यांना बाद करत असतो. मात्र बुधवारच्या सामन्यात अश्विननं गोलंदाजीसह तुफान फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. त्याच्या या कामगिरीचं सर्वांनीच कौतुक केले. त्यात त्याची पत्नी प्रीती हिने दिलेली रिअॅक्शन पाहून संपूर्ण स्टेडियम तिच्याकडे पाहतच राहिले.

आयपीएलच्या सामन्यात बुधवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सला दिल्ली कॅपिटल्सकडून 8 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता.

आयपीएलमध्ये पहिले अर्धशतक
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रविचंद्रन अश्विन क्रमांक 3 वर फलंदाजी उतरला होता. रविचंद्रन अश्विनने 38 चेंडूत 50 धावांची शानदार खेळी करत अर्धशतक झळकावले होते.

या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.  अश्विनचे हे आयपीएलमधील पहिले अर्धशतक ठरले.    

पत्नी प्रीतीची प्रतिक्रिया
रविचंद्रन अश्विनच्या या तुफानी खेळीचे स्टेडियमधील सर्व चाहत्यांसह टीममधून खेळाडूंनी कौतुक केले. तर पत्नी प्रीतीची प्रतिक्रिया ही पाहण्यासारखी होती. अश्विनने अर्धशतक पूर्ण करताच त्याची पत्नी हसत-हसत, टाळ्या वाजवून अश्विनला प्रोत्साहन देताना दिसली.

दरम्यान, रविचंद्रन अश्विनच्या पत्नी प्रीतीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजस्थान रॉयल्सने स्वतः ट्विटरवर संस्मरणीय क्षण असे कॅप्शन देत व्हिडिओ पोस्ट करत  ट्विट केले.  

अश्विनचा संघ पराभूत
रविचंद्रन अश्विनने या सामन्यात भलेही अर्धशतक झळकावले असेल, परंतू या सामन्यात त्याचा संघ राजस्थान रॉयल्सला दिल्ली कॅपिटल्सकडून 8 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर १६१ धावांचे लक्ष्य ठेवले, जे दिल्ली कॅपिटल्सने १८.१ षटकांत पूर्ण केले.Source link

Leave a Reply