IPL 2022 | CSK ला पाचव्यांदा चॅम्पियन करण्यासाठी कॅप्टन कूल धोनीचा असा आहे प्लॅन


मुंबई : चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएलमधील (IPL) सर्वात यशस्वी टीमपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra singh Dhoni) नेतृत्वाखाली CSK 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलंय. धोनीची गणना जगातील दिग्गज कर्णधारांमध्ये केली जाते. आयपीएल 2022 मध्येही चेन्नई सुपर किंग्ज संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. याची तीन मोठी कारणे आहेत. (ipl 2022 csk chennai super kings captain mahendra singh dhoni master plan for upcoming 15th season jadeja conway ruturaj)

चेन्नईचा घातक ऑलराऊंडर  

चेन्नई सुपर किंग्जची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांच्या गोटात असलेले ऑलराऊंडर खेळाडू. या स्टार ऑलराऊंडर्सच्या जोरावर चेन्नईने अनेकदा प्रतिस्पर्धी संघांना पाणी पाजलंय.  

चेन्नईकडे रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), मोईन अली आणि दीपक चहरसारखे खेळाडू आहेत. जडेजा बॅटिंगा आणि बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करतो.  

जाडेजा चेन्नईसाठी गेल्या अनेक हंगामांपासून मॅचविनर ठरला आहे. टीमला जेव्हा विकेट हवी असते, तेव्हा धोनी विश्वासाने जाडेजाला बॉलिंग देतो. त्यानुसार जाडेजा विकेट मिळवून देतो. 

सोबतच दुसऱ्या बाजूला मोईन अलीने बॅटिंगच्या जोरावर सीएसकेसाठी अनेक मॅच-विनिंग इनिंग्स खेळल्या आहेत. धोनी या ऑलराऊंडर्स खेळाडूंचा हुशारीने वापर करतो.
 
फॅफ डु प्लेसिसच्या तोडीचा ओपनर 

फॅफ डु प्लेसिसने 14 व्या मोसमात चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडसोबत ओपनिंग केली होती. चेन्नईने 15 व्या मोसमासाठी आयपीएल मेगा लिलावात टीममध्ये फॅफच्या जागी डेव्हॉन (Devon Conway) कॉनवेला संधी दिली आहे. कॉनवे सध्या धमाकेदार कामगिरी करतोय. 

कॉनवेनने न्यूझीलंडसाठी खोऱ्याने धावा केल्या आहेत. या 15 व्या मोसमात चेन्नईला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी ही डेव्हिड आणि ऋतुराजवर असणार आहे.  

ऋतुराजने गेल्या मोसमात सीएसकेसाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. तसेच तो ऑरेन्ज कॅप विनर ठरला होता. ऋतुराजने चेन्नईसाठी 14 व्या मोसमात 16 सामन्यांमध्ये 636 धावा केल्या.

‘कॅप्टन कूल’ धोनी 

धोनीने आतापर्यंत आपल्या कॅप्टन्सीत चेन्नईला 4 वेळा आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली आहे. धोनी त्याच्या शांत स्वभाव आणि चतुर आणि चालाखीसाठी ओळखला जातो. 

विकेटकीपिंग असो किंवा डीआरएस यामध्ये धोनीचा हात कोणीही पकडू शकत नाही. त्यामुळे धोनी या मोसमात टीममधल्या खेळाडूंचा अचूक वापर करुन चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल जिंकून देणार का, याकडे धोनी चाहत्यांचं लक्ष असणार आहे.  Source link

Leave a Reply