Headlines

48 तासात लावला चोरीचा तपास , बार्शी पोलिसांची कामगिरी

बार्शी /प्रतिनिधी -बार्शी शहरात सात दुकानाचे शटर उचकटून झालेल्या चोरीमध्ये एकूण 2 लाख 46 हजार साहित्य आणि रोख रक्कमेची चोरट्यांनी चोरी केली होती.ही घटना संध्याकाळी झाल्याने चोरटे पकडण्यास अडचणी येत होत्या.परंतु बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास .शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके कार्यान्वित केली होती. या पथकाने मुंबई येथे जाऊन केवळ 48 तासात मोठ्या शिताफितीने संशयित आरोपींना जेरबंद केले .मारुती चंद्रशेखर दासर ( वय २७ वर्षे ) , महेंद्र ऊर्फ मोट्या अविनाश पाटील (वय २५ वर्षे ) राहणार दोघेही हनुमान नगर ठाणे बेलापुर रोड नवी मुंबई , अभिजीत गौतम कांबळे ( वय २४ वर्षे ) राहणार सेक्टर 5 कोपरखैरणे मयुर बार चा समोर नवी मुंबई , अजय अर्जुन कानगुलकर (वय २२ वर्षे) राहणार गणेश पंचमी सोसायटी नवी मुंबई या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिस सूत्रांनुसार 28 ऑगस्ट रोजी पहाटे तीन ते पाच वाजण्याच्या सुमारास बार्शी शहरातील सात दुकानाचे शटर उचकटून चोरी झाली होती. या चोरीचा तपास अठ्ठेचाळीस तासांच्या आत बार्शी पोलिसांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते , अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , पोलीस उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे सर्जेराव पाटील बार्शी शहर पोलीस निरीक्षक आर आर शेळके , बार्शी शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी डी उदार , पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे , स. पो. फौ. वरपे , पोलीस हेड कॉन्स्टेबल माळी , पोलीस नाईक भांगे , ठेंगल , पवार, पोलीस कॉन्स्टेबल घोंगडे , बारगीर , गोसावी लगदिवे , सायबर शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी दिवस रात्र अथक परिश्रम करत गुन्हा उघडकीस आणला.

अधिक माहिती अशी की 28 ऑगस्ट रोजी पहाटे तीन ते पाच वाजण्याच्या सुमारास बार्शी शहरातील गणेश भीमराव कानडे यांचे होलसेल जीन्स या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 20 हजार रुपये रोख रक्कम व 47 हजार रुपये किमतीच्या जीन्स पॅन्ट चे 100 नग असलेला जीन्स पॅकिंग चा डाग, अमित माधव आपटे यांचे आपटे मेडिकल व प्रवीण राठोड यांचे सुरज गारमेंट दुकानातून प्रत्येकी 4 हजार रूपये रोख रक्कम ,अनाराम चौधरी यांचे पिकॉक लाईफ स्टाईल दुकानातून 40 हजार रुपये रोख रक्कम व 39 हजार रुपये किमतीचे सोहळा नग लेडीज ड्रेस , गौस तांबोळी यांचे जी.एम.ट्रेडर्स दुकानातून 4 हजार रोख रक्कम ,रणजित अंधारे यांच्या रोहित एजन्सी दुकानातून 70 हजार रुपये रोख रक्कम ,संदीप बगले यांच्या बगले मेडिकल दुकानातून 18 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल दुकानाची शटर उचकटून अज्ञात आरोपींनी चोरला होता.

या गुन्ह्यात मिळालेली माहिती सीसीटीव्ही फुटेज याच्या आधारे दोन पथके नेमून पोलिसांनी तपास सुरू केला होता. या गुन्ह्याचा तपास मुंबई-लातूर सोलापूर या भागात चालू असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्याच्या तपासात मुंबईतील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने दोन पथके नवी मुंबई येथे तात्काळ जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींनी गुन्हे कबूल केले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे मारुती चंद्रशेखर दासर ( वय २७ वर्षे ) , महेंद्र ऊर्फ मोट्या अविनाश पाटील (वय २५ वर्षे ) राहणार दोघेही हनुमान नगर ठाणे बेलापुर रोड नवी मुंबई , अभिजीत गौतम कांबळे ( वय २४ वर्षे ) राहणार सेक्टर 5 कोपरखैरणे मयुर बार चा समोर नवी मुंबई , अजय अर्जुन कानगुलकर (वय २२ वर्षे) राहणार गणेश पंचमी सोसायटी नवी मुंबई.

सदर आरोपींनी रिट्स गाडीमधून बार्शी शहरात येऊन घरफोड्या केल्या आहेत. त्यांनी त्याच दिवशी व आदल्या दिवशी बारामती कुर्डूवाडी टेंभूर्णी या भागात चोऱ्या केलेल्या आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डी.डी. उदार हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *