वाचा: Budget Phones: नवीन फोन खरेदी करताना OPPO च्या ‘या’ स्वस्त स्मार्टफोन्सचा विचार नक्की करा
Wi-Fi शी पुन्हा कनेक्ट करा:
ही सर्वात सामान्य पद्धत आहे. तुमच्या फोनमध्ये वाय-फाय कनेक्ट केल्यानंतर फोन किंवा लॅपटॉपमध्ये इंटरनेट काम करत नसेल, तर तुम्ही सर्वप्रथम फोनवरून वाय-फाय डिस्कनेक्ट करा. थोड्या वेळाने तुम्ही Wi-Fi शी कनेक्ट करू शकता. याचा फायदा म्हणजे वाय-फाय मधील समस्या दूर करता येईल आणि वाय-फाय सोबत इंटरनेट पुन्हा चालू होईल.
वाचा: Latest Smartwatch: Samsung च्या २ भन्नाट स्मार्टवॉचेस लाँच, वॉच ECG, BP सह तुमच्या स्ट्रेस लेव्हलवर लक्ष ठेवणार
Forget WiFi नेटवर्क :
यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन वाय-फाय विभागात जा. त्यानंतर Forget या पर्यायावर टॅप करा. त्यानंतर वाय-फाय नेटवर्कवर पुन्हा शोधा. आता पासवर्ड टाकून वाय-फाय नेटवर्कशी पुन्हा कनेक्ट करा. त्यामुळे वाय-फायची समस्या दूर होऊ शकते.
DNS सर्व्हर बदला:
DNS सर्व्हर वेबसाइट लिंकला IP Address मध्ये रूपांतरित करतो. वाय-फायशी कनेक्ट केलेले असतानाही जर इंटरनेट अँड्रॉइड फोनवर काम करत नसेल, तर ते इंटरनेट प्रदात्याच्या डोमेन सर्व्हरमधील समस्येमुळे देखील असू शकते. त्यामुळे डीएनएस बदलूनही काही वेळा वाय-फायची समस्या दूर होते.
राउटरच्या सेटिंग्ज देखील तपासा :
जर कोणतीही पद्धत काम करत नसेल तर तुम्ही तुमचे राउटर तपासा. काही वेळा राउटरच्या समस्येमुळे सुद्धा वाय-फाय योग्यरित्या काम करत नाही.अशा वेळी राउटर रीस्टार्ट करा आणि त्यानंतर वायफायची समस्या फिक्स करा.
वाचा: Raksha Bandhan 2022: बहिणीला गिफ्ट द्या ‘हे’ कूल गॅजेट्स, फीचर्स भारी पण, किंमत कमी