भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूचं निधन, क्रीडा जगतावर शोककळा


मुंबई : क्रिकेट विश्वातून वाईट बातमी समोर येत आहे. मुंबईचे माजी खेळाडू आणि महान क्रिकेटर विनू मंकड (Vinu Mankad Son) यांचे पुत्र राहुल मंकड (Rahul Mankad) यांचं निधन झालंय. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला.  राहुल यांच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्नावर शोककळा पसरली आहे. राहुल मंकड हे शानदार बॅट्समन होते. राहुल मंकड यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 2 मुली आहेत. (team india legendary former cricketer vinu mankad son rahul mankad passed away)

मुंबईचे माजी खेळाडू शिशिर हट्टंगडी यांनी फेसबूक पोस्टद्वारे राहुल मंकड यांच्या निधनाची माहिती दिली आहे. शिशिर यांनी आपल्या मित्रासाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. 

राहुल मंकड यांची क्रिकेट कारकिर्द 

राहुल यांनी 47 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 5 शतक आणि 12 अर्धशतकांसह 2 हजार 111 धावा केल्या. राहुल यांची 162 ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी होती. राहुल यांचं क्रिकेटसोबत अगदी जवळच नातं होतं.

राहुल यांचे बंधु अशोक आणि अतुल हे दोघे क्रिकेटर होते. अशोक यांनी टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. तर अतुल देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं योगदान दिलं. 

राहुल हे 1972-73 पासून ते 1984-85 पर्यंत क्रिकेट खेळले. राहुल यांनी अनेक सामन्यांमध्ये बॉलिंगही केली होती. त्यांनी आपल्या किकेट कारकिर्दीत 7 विकेट्स घेतल्या होत्या. 

तेच हे मंकडिंग 

नॉन स्ट्राईक एंड वरचा बॅट्समन बॉलरने बॉल टाकण्याआधी क्रिज सोडून पळत सुटतो. अशा वेळेस बॉलर क्रिज सोडलेल्या बॅट्समनला रन आऊट करतो. या प्रकाराला मंकडिंग असं म्हणतात. 

विनू मंकड यांनी या प्रकारे आऊट करण्याचा पायंडा पाडला होता. त्यामुळे या अशा प्रकारे बॅट्समनला आऊट करण्याच्या प्रकाराला मंकडिंग असं म्हटलं जाऊ लागलं. आयपीएलमध्ये रवीचंद्रन अश्विनने जोस बटलरला अशाच प्रकारे रन आऊट केलं होतं. ज्यावरुन वादाला तोंड फुटलं होतं.Source link

Leave a Reply