भारतीय महिला क्रिकेट संघात नवी एंट्री; थेट विराट कोहलीशी जोडलं जातंय ‘तिचं’ नाव


मुंबई : भारतीय महिला क्रिकेटला सध्या सुगीचे दिवस आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. एखाद्या धर्माप्रमाणे जशी या देशात क्रिकेट या खेळाची पूजा केली जाते, तितकंच अनन्यसाधारण महत्त्वं देशाच्या पुरुष क्रिकेट संघाला दिलं जातं. पण, सध्या मात्र ही परिस्थिती बदलताना दिसत आहे. (indian womens cricket team)

पुरुषांप्रमाणेच महिलांच्या क्रिकेटलाही तितकीच लोकप्रियता मिळताना दिसत आहे. संघातील खेळाडू, त्यांची कामगिरी या साऱ्यावरही क्रीडारसिकांचं लक्ष असल्याचं दिसून येत आहे. 

भारतीय क्रिकेटमध्ये महिलांचा संघ सध्या चांगली कामगिरी करत असतानाच आता संघातील एका नवख्या खेळाडूची कमालीची चर्चा होत आहे. 

थेट विराट कोहलीशीच या खेळाडूचं नाव जोडलं गेल्यामुलं तिच्या प्रसिद्धीमध्ये आतापासूनच वाढ होताना दिसत आहे. संघात दमदार प्रदर्शनासाठी घाम गाळणारी ही खेळाडू दुसरीतिसरी कोणी नसून, ती आहे अनुष्का शर्मा. 

बसला ना धक्का? एका मुलीची आई असणारी आणि अभिनय क्षेत्रात कारकिर्द करणारी अनुष्का क्रिकेटकडे कशी बरं वळली असाच प्रश्न तुम्हालाही पडत आहे ना? 

हा प्रश्न पडायला कारण ठरत आहे तो म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये अनुष्का क्रिकेटचा सराव करताना दिसत आहे. कारण, येत्या काळात ती ‘छकडा एक्स्प्रेस’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. 

जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामी हिची व्यक्तीरेखा अनुष्का या चित्रपटात साकारणार आहे. ज्यासाठी तिनं या रोखानं तयारीही करण्यास सुरुवात केली आहे. 

नेट प्रॅक्टीस, फिटनेस ट्रेनिंग आणि तरही विविध प्रकारचा सराव ती सध्या करत आहे. क्रिकेटचं मैदान अनुष्काला अनोळखी नाही, पण आता ती झुलन गोस्वामी नेमकी किती ताकदीनं साकारते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. Source link

Leave a Reply