IND vs WI : टीमच्या पराभवानंतरही Nicholas Pooran खूश, म्हणाला…


मुंबई : निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला भारताविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलंय. पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदादमध्ये येथे झालेल्या सामन्यात कॅरेबियन टीमने पाहुण्या भारताला कडवी झुंज दिली. पण शेवटी त्यांचा 3 रन्सने त्यांचा पराभव झाला. टीम इंडियाने विंडीजला 309 रन्सचं लक्ष्य दिलं होतंय. दरम्यान त्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देत 305 रन्स केले.

Nicholas Pooran ने पराभवानंतरंही केली खेळाडूंची तारीफ

पराभवानंतर टीमच्या कामगिरीबद्दल निकोलस पूरन म्हणाला, “आमच्यासाठी हे विजयापेक्षा कमी नाहीये. आम्ही काय करू शकतो हे सर्वांनी पाहिलं आणि आशा आहे की, आम्ही तिथून ताकदीकडे पुढे येऊ. उर्वरित मालिकेची आतुरतेने वाट पाहत असताना, हा एक चांगला फलंदाजीचा ट्रॅक होता आणि आमच्या गोलंदाजांनी त्यांना रोखण्याचं कौतुकास्पद काम केलं.”

तो पुढे म्हणाला, “आम्हाला एकमेकांवर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि मी प्रत्येकाला सांगत राहतो की, आमच्यासमोर आव्हानं असतील, परंतु सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे.”

पहिला सामना भारताने जिंकला असला तरी वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी दिलेली चांगली झुंज दिली. टीम इंडियाने समोरच्या टीमला 309 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या टीमने चांगला खेळ केला. 

विंडीजकडून काईल मेयर्सने 75 आणि ब्रँडन किंगने 54 रन्स केले. रोमॅरियो शेफर्ड (39) आणि अकील हुसेन (33) यांनी नाबाद भागीदारी करत विंडीजला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र अवघ्या 3 रन्सनी वेस्ट इंडिजचा पराभव झाला.Source link

Leave a Reply