Headlines

IND vs PAK : भारत-पाक आठवड्याभरात पुन्हा भिडणार, कोण जिंकणार?

[ad_1]

यूएई : आशिया चषक 2022 मध्ये (Asia Cup 2022) टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK)  हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकत्र भिडणार आहेत. या उभयसंघात रविवारी 4 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. आठवड्याभरात दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. सुपर 4 (Super 4 Round) राउंडमधील हा सामना असणार आहे. साखळी फेरीतील सामना 27 ऑगस्टला झाला होता. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला होता. त्यामुळे रविवारी होणारा सामन्यात पुन्हा पाकिस्तानला पराभूत करण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. या सामन्यानिमित्ताने दोन्ही संघांची आकडेवारी काय म्हणते हे आपण जाणून घेणार आहोत. (asia cup 2022 super 4 round ind vs pak team india vs pakistan face again in 1 week head to head records rohit sharma babar azam)  

हेड टु हेड आकडेवारी  (Head To Head Records)  

टीम इंडिया-पाकिस्तानचा आशिया कपमध्ये आतापर्यंत एकूण 15 वेळा आमनेसामना झाला आहे. 15 पैकी 9 सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवला. तर पाकिस्तानला फक्त 5 वेळा यश आलंय.  या दरम्यान 1997 मध्ये झालेल्या एका सामन्याचा निकाला लागला नाही. दरम्यान टीम इंडियाने एकूण 14 पैकी सर्वाधिक 7 वेळा आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली आहे.

आठवड्यात पुन्हा आमनेसामने

दरम्यान दोन्ही संघ आठवड्याभरात दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. या आधी हे दोन्ही कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी 27 ऑगस्टला भिडले होते. टीम इंडियाने या सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. यासह टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा घेतला होता. 

संभाव्य संघ 

भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान, दीपक चाहर, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल. 

पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, उस्मान कादिर आणि मोहम्मद हसनैन. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *