Headlines

IND vs NZ: हार्दिकच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह? ‘या’ बड्या खेळाडूने पांड्याला झाप झाप झापलं!

[ad_1]

India vs New Zealand 1st T20I: यजमान भारत आणि पाहुण्या न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-ट्वेंटी (IND vs NZ 1st T20I) सामन्यात किवींनी भारताला धोनीच्या होमपिचवर (Ranchi) लोळवलं. टीम इंडियाचा 21 धावांनी पराभव केला. 178 धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ फक्त 155 धावा करू शकला. पहिल्या सामन्यात अनेक चूका झाल्याचं दिसलं. त्यामुळे भारताचा पराभव होणार हे पक्कं झालं होतं. भारताच्या अपयशाला अनेक कारणं आहेत. त्यावर आता चर्चा होताना दिसतेय. अशातच आता भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचा क्रिकेटतज्ज्ञ वसीम जाफरने (Wasim Jaffer On Hardik Pandya) मोठं वक्तव्य केलंय. (Wasim Jaffer Points Out Hardik Pandya Mistakes In The First T20I Against New Zealand sports news)

काय म्हणाला वसीम जाफर?

वसीम जाफरने पहिल्या टी-ट्वेंटीमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. जाफर म्हणतो की, ज्या परिस्थितीनुसार आज गोलंदाजी नव्हती. रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-ट्वेंटीमध्ये, फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून भरपूर मदत मिळत होती, तरीही हार्दिकने हुड्डाच्या ओव्हरचा कोटा पूर्ण केला नाही, असं वसीम जाफर (Wasim Jaffer) म्हणालाय.

जर तुम्ही उमरान मलिकला (Umran Malik) एक ओव्हर देणार असाल आणि मावीला दोन ओव्हर देणार असाल तर त्याच्या जागी अतिरिक्त फलंदाज आणणं हा एक चांगला पर्याय असतो, असा सल्ला त्याने पांड्याला दिलाय. कदाचित हे बदल येत्या सामन्यांमध्ये पाहायला मिळतील, असा विश्वास देखील त्याने यावेळी व्यक्त केलाय.

आणखी वाचा – IND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवाची 3 मुख्य कारणं, जाणून घ्या

दरम्यान, वॉशिंग्टन (Washington Sundar) आणि कुलदीपने (Kuldeep Yadav) ज्या प्रकारे गोलंदाजी केली, ती कौतुकास्पद होती. एकंदरीत मला वाटतं की, न्यूझीलंडने भारतापेक्षा चांगलं क्रिकेट (Cricket) खेळले, त्यामुळे त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे, असंही जाफर म्हणाला आहे. त्यामुळे आता आगामी सामन्यात भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *