IND vs NZ: “मला झोपू देत नाही, रोज रात्री तो…”, LIVE कॅमेऱ्यासमोर Shubman Gill ने केली पोलखोल!


IND vs NZ ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील  (India Vs New zealand) पहिला सामना बुधवारी खेळण्यात आला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने 12 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill) खणखणीत द्विशतक ठोकलं. न्यूझीलंडसाठी मायकेल ब्रेसवेलने (Michael Bracewell) प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आलं नाही. या विजयासह भारतीय संघा मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. अशातच सामना झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने द्विशतक (Double Century) ठोकलेल्या दोन्ही खेळाडूंची मुलाखत (rohit sharma interview) घेतली. त्यावेळी शुभमन गिलने धक्कादायक वक्तव्य केलंय. (rohit sharma interview with shubman gill ishan kishan after ind vs nz odi watch video marathi news)

कॅप्टन रोहितने दोन यंग खेळाडूंचा इंटरव्ह्यू (rohit sharma interview with shubman gill ishan kishan) घेतला. त्यावेळी रोहितने दोन्ही खेळाडूंची ओळख आपल्या पद्धतीने करून दिली. त्यावेळी ईशाने शुभमनला प्रश्न विचारला. इशान किशनने गिलला त्याच्या प्री-मॅच रूटीनबद्दल विचारलं. त्यावर तुम्ही दोघे एकाच खोलीत झोपता, त्यामुळे तुम्हाला माहिती असेल. गिलने त्यावर उत्तर दिलं. हा माणूस (ishan kishan) माझा प्री मॅच रूटीन बिघडवतो, तो मला रात्री झोपू देत नाही, असं गिल म्हणाला.

आणखी वाचा – Suryakumar Yadav ने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड, BCCI लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता

ईशान किशनला रात्री मुव्ही (Movie) पहायचा असतो आणि त्याला मोठ्या आवाजात पहायचा अलतो. त्याला इअरकॉड लावलेले आवडत नाही, असं शुभमन गिल म्हणालाय. इंटरव्यूमध्ये (Interview) ईशान किशन मस्करीत म्हणाला, शुभमन माझ्या खोलीत झोपला, त्यामुळे त्याला डबल सेंच्यूरी (Double century) करता आली.ॉ

पाहा Video – 

दरम्यान, मुलाखतीत रोहितने (Rohit Sharma) विचारलेल्या प्रश्नांची उत्तर शुभमन (Shubman Gill) आणि ईशानने दिली. त्यावेळी अखेरीस रोहितने ईशानला टोले लगावले. मला एक सांग ईशान तू डबल सेंच्युरी मारली, तरीही तु आत्तापर्यंत 11 च सामने खेळले आहेत. रोहितचा टोमणा इशानला समजला. त्यावेळी त्याने कॅप्टर तर तुम्ही आहात, असं म्हणत इशानने खणखणीत रिप्लाय दिलाय. त्यानंतर शुभमन गिल, ईशान किशन (ishan kisha) आणि रोहित शर्माला हसू आवरलं नाही. तिघंही खदाखदा हसल्याचं पहायला मिळतंय.Source link

Leave a Reply