IND vs ENG T20I: रोहित नाही तर हा खेळाडू नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार?


India vs England T20 Series: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहचली आहे. तर दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाला इंग्लंडमध्ये एक कसोटी, 3 टी-20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या टी-20 मालिकेसाठी संघाला नवा कर्णधार मिळू शकतो. (ind vs eng t20i series hardik pandya may captaincy team india against england)

हा खेळाडू होणार कॅप्टन? 

सिनीअर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 1 जुलैपासून कसोटी सामन्याने होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे.  TOI च्या वृत्तानुसार, केवळ आयर्लंड दौऱ्यासाठी निवडलेला संघच इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची T20 मालिका खेळू शकतो. अशा परिस्थितीत हार्दिक इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे नेतृत्व करताना दिसू शकतो. 

कसोटी संघासाठी टी 20 मध्ये खेळणं कठीण

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना 1-5 जुलै दरम्यान बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात येणार आहे.  तर दुसऱ्या बाजूला 7 जुलैपासून टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. 

त्यामुळे कसोटीत सहभागी असलेल्या खेळाडूंना इतक्या कमी वेळात टी-20 सीरिजमध्ये खेळणं कठीण होईल. त्यामुळेच आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या संघालाच या मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकते. मात्र निवडकर्त्यांनी अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया

हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक. 

इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया 

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.Source link

Leave a Reply