Headlines

IND Vs BAN ODI: रोहित शर्माला झालं तरी काय? दुसऱ्या षटकात सोडावं लागलं मैदान

[ad_1]

India Vs Bangladesh 2nd ODI: भारत विरुद्ध बांगलादेश तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. पहिल्या सामना बांगलादेशनं जिंकल्याने मालिकेत 1-0 ने आघाडी आहे. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. बांगलादेशनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या षटकातच भारताच्या कर्णधाराला क्षेत्ररक्षण करत असताना मैदान सोडावं लागलं. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर रोहित शर्माला क्षेत्ररक्षण करताना जबर दुखापत झाली. अनामुलनचा स्लिपला झेल घेताला रोहितच्या डाव्या हातावर जोरात लागला. त्यामुळे त्याला वेदना असह्य झाल्या. त्यामुळे मैदानाबाहेर पडावं लागलं. 

रोहित शर्मानं संघाचं दुसरं षटक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला सोपवलं. स्ट्राईकला असलेल्या बांगलादेशच्या अनामुल त्याला सामोरा गेला. पहिल्या दोन चेंडूवर त्यांनी दोन चौकार ठोकले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. चौथा चेंडू मारताना कट लागली आणि दुसल्या स्लिपला उभ्या असलेल्या रोहित शर्माकडे गेला. मात्र झेल घेताना सुटला आणि गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तात्काळ मैदान सोडून पॅव्हेलिनमध्ये जावं लागलं. सिराजनं पाचवा चेंडूवर अनामुलला तंबूचा रस्ता दाखवला. अनामुल 11 या धावसंख्येवर असताना पायचीत केलं. 

बातमी वाचा- Virendra Sehwag च्या मुलाची दिल्ली संघात निवड, वडिलांसारखी बॅटिंग स्टाईल! Watch Video

बांगलादेशचा संघ- अनामुल हक, लिट्टोन दास, नजमुल होसेन शांतो, शाकिब अल हसन, मुशफिकर रहिम, महमुदुल्ला, अफिफ होस्सेन, मेहिदी हसन, इबादत होस्सेन, नसुम अहमद, मुस्ताफिजुर रहमान

भारताचा संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वाशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *