IND vs BAN, 3rd Odi : तिसऱ्या सामन्याचं ठिकाण बदललं, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय


मुंबई : टीम इंडिया (Team India) न्यूझीलंड (India Tour Of New Zealand 2022) दौऱ्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर (India Tour Of Bangladesh 2022)  जाणार आहे. टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. वनडे सीरिजमधील तिसऱ्या सामन्यांच ठिकाण बदलण्यात आलंय. (india tour bangladesh ind vs ban 3rd odi location change now match played at zahur ahmed chowdhury stadium chattogram)

तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचं आयोजन हे ढाक्यात करण्यात आलं होतं. मात्र आता हा सामना चिटगावमध्ये खेळवण्यात येणार आहे. 4 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. तिसरा सामना 10 डिसेंबरला ढाक्यात पार पडणार होता.  मात्र नेशनलिस्ट पार्टीकडून याच दिवशी विरोध प्रदर्शन आणि रॅलीचं आयोजन केलंय. त्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतलाय. 

बांगलादेश विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि यश दयाल. 

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.Source link

Leave a Reply