Headlines

IND vs AUS: आर अश्विनच्या नावावर अनोखं शतक, कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास

[ad_1]

IND vs AUS, 2nd Test: टीम इंडियाचा (Team India) दिग्गज ऑफ स्पीनर रविचंद्रन अश्विनच्या (R Ashwin) नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (Inida vs Australia 2nd Test) मोठा विक्रम जमा झाला आहे. दिल्ली कसोटीत अश्विनच्या नावावर अनोख्या शतकाची नोंद झाली आहे. दुसऱ्या कसोटीत भारतीय स्पिनर्सच्या जाळात कांगारु पुरते फसले आणि त्यांची पहिली इनिंग अवघ्या 263 धावांवर आटोपली. यात अश्विन आणि जडेजा (Ravindra Jadeja) या स्पीन जोडगळीने तब्ब सहा विकेट घेतल्या. यात अश्विनचा वाटा होता तीन विकेटचा. याबरोबरच अश्विनच्या नावावर एक मोठा रेकॉर्ड जमा झाला आहे. 

कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तीन विकेट घेत अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल 100 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. याबरोबरच त्याने टीम इंडियाचा महान गोलंदाज अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शंभर विकेट घेण्याची किमया करणारा अश्विन हा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. 

अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 111 कसोटी विकेट घेतल्या आहेत. आता अश्विनने शंभर विकेट हा टप्पा पार केला आहे. अश्विनने 90 कसोटी सामन्यात 460 विकेट घेतल्या आहेत. तर 113 एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 151 विकेट जमा आहेत. 65 टी20 मध्ये 72 आणि आयपीएलच्या 184 सामन्यात 157 विकेट घेण्याची कामगिरी त्याने केली आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज

1. अनिल कुंबळे – 111 कसोटी विकेट

2. रविचंद्रन अश्विन – 100 कसोटी विकेट

3. हरभजन सिंह – 95 कसोटी विकेट 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अश्विनची कारकिर्द

37 कसोटी 

विकेट – 100

स्ट्राईक – 29.21

पाच विकेट घेण्याची 6 वेळा कामगिरी

बेस्ट बॉलिंग फिगर – 7/103

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

1. मुथैया मुरलीधरन (श्रीलंका) – 800 कसोटी विकेट

2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – 708 कसोटी विकेट

3. जेम्स एंडरसन (इंग्लैंड) – 677 कसोटी विकेट

4. अनिल कुंबले (भारत) – 619 टेस्ट विकेट

5. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – 567 कसोटी विकेट

6. ग्लेन मॅक्ग्रा (ऑस्ट्रेलिया) – 563 कसोटी विकेट

7. कोर्टनी वॉल्श (वेस्टइंडीज) – 519 कसोटी विकेट

8. नाथन लियोन (ऑस्ट्रेलिया) – 461 कसोटी विकेट

9. रविचंद्रन अश्विन (भारत) – 460 कसोटी विकेट  

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज

1. अनिल कुंबळे – 619 कसोटी विकेट

2. रविचंद्रन अश्विन – 460 कसोटी विकेट

3. कपिल देव – 434 कसोटी विकेट

4. हरभजन सिंह – 417 कसोटी विकेट

5. ईशांत शर्मा/जहीर खान – 311 कसोटी विकेट 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *