Headlines

IND vs AUS : …शेवटी आई आईच असते; ऑस्ट्रेलयाविरुद्ध लेक खेळणार याच आनंदात भारतीय क्रिकेटपटूची आई मैदानावर

[ad_1]

IND vs AUS : यजमान भारत (India) आणि पाहुणा ऑस्ट्रेलिया (Australia) या दोन्ही क्रिकेट संघांमध्ये (Border Gavaskar test series) बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेची सुरुवात गुरुवारी झाली. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेचा पहिला सामना (Nagpur) नागपूर येथे खेळला जात आहे. हा सामना अनेक कारणांनी खास आहे, कारण यावेळी संघातून दोन खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. (Ishan Kishan) ईशान किशनऐवजी KS Bharat आणि (shubhman Gill) शुभमन गिलच्या ऐवजी सूर्यकुमार यादव या दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत आणखी एक टप्पा ओलांडला. हे सर्वकाही घडत असताना गुरुवारी मैदानातील प्रत्येक क्षण पाहण्याजोगा होता. (IND vs AUS 1st Test)

संघातील अनुभवी खेळाडू (Cheteshwar Pujara) चेतेश्वर पुजारा यानं केएस भरत याला टेस्ट कॅप देत त्याचं संघात स्वागत केलं. नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानातील हे क्षण भरत याच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आणि तितकेच भावनिक होते, कारण बऱ्याच प्रतिक्षेनंतर या 29 वर्षीय खेळाडूला हा दिवस पाहायला मिळाला. त्याच्यासाठी हे क्षण आणखी खास होते, कारण यावेळी त्याची आईसुद्धा मैदानावर उपस्थित होती. (KS Bharat with mother)

…आणि आईनं लेकाला घट्ट मिठी मारली 

भरतला संघाकडून Test Cap मिळताच आईनं लेकाला घट्ट मिठी मारली. लहानपणापासून पाहिलेलं त्याचं स्वप्न साकार होत असताना पाहून भरतची आईसुद्धा भावनिक झाली. सोशल मीडियावर या गोड क्षणांचे अनेक फोटो व्हायरल झाले. हा दिवसभरातील सर्वात Best Photo असल्याच्या प्रतिक्रिया यावर नेटकऱ्यांनी दिल्या. 

नागपूर येथे होणाऱ्या या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवच्याही कुटुंबीयांची उपस्थिती होती. संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून त्याला Test Cap देण्यात आली. हा क्षण यादव कुटुंबीयांसाठीसुद्धा प्रचंड अभिमानाचा होता. 

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत भरतला मिळालं स्थान… 

2022 च्या अखेरीस झालेल्या भीषण अपघातामध्ये भारतीय संघातील स्टार खएळाडू ऋषभ पंत (Rishabh pant) दुखापतग्रस्त झाला. जबर दुखापतींतून सावरणं कठीण असल्यामुळं तो काही काळासाठी क्रिकेटपासून दुरावला गेला. ज्यामुळं ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेसाठी केएस भरतची निवड करण्यात आली. (Rishabh pant accident)

आंध्र प्रदेशसाठी भरतनं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगलीच धावसंख्या उभी केली केही आहे. 86 सामन्यांमध्ये त्यानं आतापर्यंत 4707 धावा केल्या असून, यामध्ये 9 शतकांचा समावेश आहे. त्याच्या नावे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतकीय खेळीची नोंद असून, तो संयमी wicketkeeping साठी ओळखला जातो. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *