I wanna …. अभद्र प्रश्न विचारणाऱ्याला समंथाकडून जशास तसं उत्तर


मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिची आतापर्यंतची कारकिर्द दाक्षिणात्य चित्रपटांमध्येच घडली असली तरीही तिचा चाहतावर्ग मात्र या भाषेपुरता किंवा कोणत्याही प्रांतापुरता मर्यादित राहिला नाही.  (Samantha Ruth Prabhu)

संपूर्ण देशात आणि परदेशातही चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या समंथानं तिची कारकीर्द फार कमी काळातच लोकप्रियतेच्या शिखरावर नेली. 

खासगी आयुष्यात मात्र समंथाला काही अडचणींचा सामना करावा लागला. अभिनेता नागा चैतन्य याच्याशी असणाऱ्या तिच्या वैवाहिक नात्याला तडा गेला आणि आयुष्याच्या कठीण वळणावर समंथा येऊन पोहोचली. 

आता कुठे ती यातून सावरत असतानाच काही नेटकऱ्यांनी मात्र तिला डिवचण्याचा प्रयत्न केला. 

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या समंथानं नुकतंच इन्स्टाग्रामवर Ask Me Anything सेशन केलं. 

या सेशनमध्ये नेटकऱ्यांच्या प्रश्नांना तिनं उत्तरं दिली. पण, काहीजण मात्र ‘हम नही सुधरेंगे’ अशाच अविर्भावात इथंही दिसते. 

“Have you reproduced because I wanna reproduce you”, असा प्रश्न एका युजरने तिला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत समंथानं लिहिलं, आधी  ‘reproduce’ चा अर्थ गुगलवर पाहा आणि मग तो वाक्यात कसा वापरावा याची माहिती घे. 

अभद्र भाषेत कमेंट करणाऱ्या त्या युजरला समंथानं तशाच अंदाजात फटकारलं आणि सड़ेतोड उत्तर दिलं. 

यावेळी समंथानं अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. पण, या एका युजरमुळं तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली असणार हे नक्की. Source link

Leave a Reply