आई २४/७ ड्युटीवर; प्रत्येकानं वाचावी अशीच पोस्ट शेअर करत अभिनेत्रीनं जिंकली मनं…


मुंबई : एकाच ठिकाणी काम करुन किंवा मग ठरलेल्या वेळांमध्ये रोज एकच काम करुन एका क्षणी आपल्याला इतका कंटाळा येतो की या कामापासूनच दूर जाण्याची इच्छा होते. ‘ब्रेक तो बनता है’, असं म्हणत आपल्यापैकी अनेकजण कामातून केव्हा एकदाची उसंत मिळते याचीच वाट पाहत असतो. (Mother son relationship)

आईचं मात्र याउलट असतं. तिचं काम कधीच थांबत नाही. किंबहुना तिच्या कामाची पद्धती कधीच बदलतही नाही. बदललीच तरीही आई कधीच निवांत नसते. 

इथं आई, म्हणजे लेकराची काळजी घेणारी प्रत्येक महिला. अगदी तिशीपासून शंभरीपर्यंतच्या आईचं मन सारखंच. ही बाब आपण नाकारूच शकत नाही. 

एका लोकप्रिय अभिनेत्री आणि युट्यूबरची सोशल मीडिया पोस्ट पाहूनही याचाच अंदाज येत आहे. दैनंदिन जीवनातून काही वेळ काढत ही अभिनेत्री निसर्गाच्या कुशीत काही निवांत क्षणांचा आस्वाद घेत आहे. 

इथं तिला साथ मिळत आहे ती म्हणजे तिच्या चिमुकल्या बाळाची. कामाच्या व्यापापासून ही अभिनेत्री दूर आली असली तरीही काही जबाबदाऱ्या मात्र तिला इथंही पूर्ण कराव्या लागत आहेत. या जबाबदाऱ्या आहेत आई असण्याच्या. 

आई चोवीस तास ऑन ड्युटी असते, अर्थात आईची कामं कधीच संपत नाहीत असं म्हणणारी ही अभिनेत्री आहे उर्मिला निंबाळकर. (Actress you tuber urmila nimbalkar )

उर्मिलानं तिला मुलगा अथांग याला समुद्रकिनारी दूध पाजतानाचा एक फोटो शेअर केला आहे. जिथं वाळूत बसून ती एकिकडे निसर्गाचा आनंद घेताना दिसतेय, तर दुसरीकडे मुलाला दूध पाजताना दिसतेय. बरं, अथांगसुद्धा इथं समुद्राला न्याहाळताना दिसत आहे. 

आई-मुलाचं सुरेख नातं आणि त्यासोबतच पाठ न सोडणाऱ्या, तरीही तितक्याच हव्याहव्याशा वाटणाऱ्या जबाबदाऱ्या उर्मिलाच्या या पोस्टमधून नेटकऱ्यांची मनं जिंकून गेल्या. Source link

Leave a Reply