Headlines

Horoscope Today 15 June : आजचा दिवस धोक्याचा की मोक्याचा? पाहा काय सांगते तुमची रास

[ad_1]

Horoscope Today 15 June : दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

मेष- नोकरी बदलण्याची संधी आज तुम्हाला मिळणार आहे. मानसिक स्थैर्य ठेवा. नव्या लोकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी मैत्री करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. 

वृषभ- नोकरीच्या ठिकाणी मन लावून काम करा. सहकाऱ्यांशी ईर्ष्या करू नका. रोगमुक्त होण्याची संधी तुम्हाला मिळणार. मनात एखाद्या गोष्टीची भीती असेल. 

मिथुन- एखाद्या नव्या गोष्टीची माहिती मिळवून घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. शरीरात वेदना होऊ शकतात. आराम करा. 

कर्क- एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळेल. मोठ्या पगाराची नोकरी मिळेल. आज अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. 

सिंह – नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळणार आहे. अती क्रोध करु नका. संध्याकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येणार आहे. 

कन्या- विवाहयोग आहे. आज एखादं चांगलं स्थळ तुमच्यापर्यंत येणार आहे. कुटुंबीयांसोबत राहा. आर्थिक लाभ होणार आहे. 

तुळ- कोणतीही अडचण असल्यास कुटुंबीयांशी संपर्क साधा. पोटविकार उदभवू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक – सामाजिक कार्यांमध्ये सहभागी व्हा. काही नव्यानं ओळख झालेल्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. 

धनु- आज कुटुंबाच्या नजरेत तुम्हाला मानाचं स्थान मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्याची संधी आहे. आर्थिक लाभ होणार आहे. 

मकर – पती पत्नीमध्ये लहानसा वाद होण्याची शक्यता आहे. पण हा वाद फार काळ टिकणार नाही. एकमेकांना समजून दाखवण्याची तयारी दाखवा. 

कुंभ- व्यवसायात नफा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचा योग आहे. वरिष्ठांचं सहकार्य मिळणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. 

मीन – व्यापाऱ्यांना नफा मिळणार आहे. आपआपसांत ताळमेळ साधत पुढे जा. फायदा तुमचाच आहे. समोर आलेल्या संधीचं सोनं करा. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *