Horoscope 19 February 2022 : शनिवारी ‘या’ राशींच्या लोकांना करावा लागले अडचणींचा सामना


मुंबई : शनिवार सिंह राशीच्या लोकांकरता अडचणी घेऊन येणार आहे. तूळ राशीच्या लोकांना आज धनप्राप्ती होईल. आजचा दिवस १२ राशींच्या लोकांकरता असेल खास. (Horoscope 19 February 2022 Saturday Astrology Todays Zodiac Sign) 

मेष : या शनिवारी तुम्हाला चहूबाजूंनी प्रशंसा ऐकू येईल. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली काम पूर्ण होतील. तरूणांना नवा रोजगार मिळणार आहे. घरात खर्च होईल. 

वृषभ : शनिवारी तुम्हाला सगळ्यांशी नम्रतेने वागावं लागेल. राजकारणात प्रगती कराल. काही नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. सरकारी कामात पैसा लावाला लागेल. 

मिथुन : या शनिवारी आत्मविश्वास आणि मेहनतीने काम करावं लागेल. व्यवसाय वाढवण्याची गरज आहे. बँकेकडून लोन घ्यावं लागेल. कुणाला उसने दिलेले पैसे मिळू शकतात. 

कर्क : शनिवारी दिवसाची सुरूवात चांगली होईल. पैशांची जुळवाजुळव करावू लागेल. कुटुंबियांचा उत्साह महत्वाचा ठरेल. 

सिंह : शनिवारी तुम्हाला प्रत्येकाचा शब्द ऐकाव लागेल. सोबतच अनेक समस्या समोर येणार आहेत. महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी. 

कन्या : शनिवारी तुम्हाला खूप विनम्र राहावं लागेल. राजकारणात संपर्क वाढवा. सरकारी कामांमध्ये चांगला योग आहे.

तूळ : शनिवारी लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून वागा. समजूतदारपणे वागा. धन प्राप्त होईल. घरात लक्ष द्या. शनिवारी मन शांत ठेवा. 

वृश्चिक : शनिवारी तुमचा कुटुंबाशी संपर्क वाढवा. प्रोफेशनल राहणं अत्यंत गरजेचं आहे. व्यापारिक दृष्टिकोण आज महत्वाचा ठरेल. आज चांगली कामाची किंमत होईल. 

धनू : शनिवार तुम्हाला आनंद देईल. बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस महत्वाचा. पैसा कमवण्याची सुवर्णसंधी आज आहे. 

मकर : शनिवार महिलांसाठी खास आहे. सगळ्यांचा आशिर्वादाचा परिणाम चांगला होईल. रखडलेली काम आज पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा. 

कुंभ : शनिवारचा दिवस खूप आत्मविश्वासाने भरलेला आहे. कुटुंबाच्या यशाचा विचार केला. कामात भरलेला असेल आजचा दिवस. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. काम करण्यासाठी महत्वाचा दिवस आहे पण शांत राहा. 

मीन : शनिवारी मीन राशीच्या लोकांसाठी चांगली आनंदाची बातमी मिळणार आहे. मेहनत करून कष्टाची काम देखील आनंदाने कराल. आज कुटुंबाची साथ मिळेल. व्यापारी वर्गाला आजचा दिवस महत्वाचा. Source link

Leave a Reply