Hina Khan चं Urfi Javed च्या पावलावर पाऊल? ट्रान्सपरंट ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले…


Hina Khan : हिना खान (Hina Khan) सध्या टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. ये रिश्ता क्या केहेलाता हेैं (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकांपासून सुरूवात करत तिनं आत्ता आपला चित्रपटांतूनही वेगळा ठसा उमटवला आहे. अगदी बिग बॉसपासून ते विविध रिएलिटी शोजमधून तिनं आपल्या अभिनयाचा डंका पेटवला आहे. (television actress hina khan wears black transparent dress netizens says she is copying urfi javed photo goes viral)

हिना खानही सोशल मीडियावर सक्रिय असते त्याचबरोबर तीसुद्धा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या हिना खान तिच्या अशाच एका वेगळ्या कारणामुळे सध्या चर्चेत आहे. नुकताच ओटीटी प्ले अॅवॉर्ड 2022 हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला अनेक सेलिब्रेटींनी सहभाग दर्शवला होता. सारा अली खान, कार्तिक आर्यन, नेहा धुपिया, तापसी पन्नू, विद्या बालन आणि यात आणखीही काही स्टार्सचा समावेश होता. 

सगळ्यांनी आपल्या हटके फॅशननं उपस्थितांची मनं जिंकली पण त्यातही सगळ्यात लक्षवेधी ठरला तो हिना खानचा ब्लॅक सी-थ्रु गाऊन. (Black see through Gown) हा ट्रान्सपरंट ड्रेस पाहून मात्र सगळ्या नेटकऱ्यांनी हिनाची खिल्ली उडवली आहे आणि तिला उर्फी जावेद पार्ट 2 (Urfi Javed Part 2) असेही संबोधले आहे. 

सध्या हिनाचा हा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल होतो आहे. हिनानं आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून आपल्या या ड्रेसमधले फोटोज पोस्ट केले आहेत. 

हिनाचा हा गाऊन कट-आऊट बॉटम्ससह जोडलेला होता त्याचसोबत तिनं यावर मिसमॅच असणाऱ्या इयरिंग्सही घातल्या होत्या. या ड्रेसचे स्टाईलिंग फार उत्तम असले तरी तिला नेटकऱ्यांनी मात्र ट्रोल केले. 

काय म्हणाले ट्रोलर्स? 
या ड्रेसवर ट्रोलर्सनी हिनाला उर्फी पार्ट 2 म्हटले आहे. अनेकांना हिनाचा हा ड्रेस अजिबातच आवडला नाही त्याचसोबत अनेकांनी हिनाला ट्रोल करत तिच्या लुक्सचीही खिल्ली उडवली. तर काहींना तिला ओव्हरएक्टिंगची दुकान म्हणत जिडवलेही. Source link

Leave a Reply