Headlines

ही खरी मीरा… घर नव्हे, गोठ्यात रमतेय कृष्णभक्तीत लीन झालेली अभिनेत्री

[ad_1]

मुंबई : जीवनाची विस्कटलेली घडी पूर्ववत करण्यासाठी आपण अनेकदा काही मार्गांचा अवलंब करतो. कुठेतरी फिरायला जातो, जवळच्या आणि विश्वासार्ह व्यक्तीशी संवाद साधतो, मन मोकळं करतो किंवा मग अध्यात्माचा स्वीकार करतो. अध्यात्म, जीवनाला एका वेगळ्या दिशेनं नेणारा मार्ग. हा मार्ग प्रत्येकाला जमतो आणि पटतो असं नाही, पण जे या मार्गावर जातात त्यांना आलेले अनुभव सर्वांनाच भारावणारे असतात. 

सध्या अशाच अनुभवांनी परिपूर्णतेच्या मार्गावर जाण्याचा प्रवास करत आहे एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री. (Krishna devotee )

‘अनुपमा’ या गाजलेल्या मालिकेमध्ये ‘नंदिनी’ साकारणारी ही अभिनेत्री आहे, अनघा भोसले. अनघानं एकाएकी कलाजगतातून काढता पाय घेत अध्यात्माला आयुष्य वाहण्याचा निर्णय घेतला. (Actress anagha bhosle)

वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी, या कलाजगतामध्ये आपली वेगळी ओळख तयार करण्यात यशस्वी ठरत असतानाच अनघानं हा निर्णय घेतल्यामुळं सर्वांनाच धक्का बसला. 

तिनं केलेल्या या त्यागाकडे थक्क होऊन पाहणाऱ्यांसाठी या अभिनेत्रीनं एक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती गोठ्यामध्ये गायींना प्रेमानं कुरवाळताना दिसत आहे. 

इतकंच नव्हे, तर त्यांना खाऊही घालत आहे. वासरु जेव्हा अनघाकडे प्रेमानं येत तिला स्पर्श करत आहे, तेव्हासुद्धा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोडा आहे. कृष्णाला आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय अनघानं घेतला आहे. 

तिच्या पोस्टच्या कॅप्शनमधून याचा अंदाज लगेचच लावता येत आहे. कृष्णभक्तीत तल्लिन असणाऱ्या या अभिनेत्रीचं बदलेलं रुप थक्क करत असलं तरीही नकळतच तिच्या निर्णयाचं कौतुकही केलं जात आहे. काहींनी तर तिला मीरेचीही उपमा दिली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *