अरे हा तर Casanova! 4 अभिनेत्रींशी अफेअर, पत्नीच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेत्यानं गाठली हद्द….


मुंबई : कोणाच्याही अवतीभोवती मुलींचा जास्तच गराडा दिसला, किंवा अमुक एक व्यक्ती मुलींममध्ये किंवा मग महिला वर्गामध्ये अपेक्षेहून जास्त लोकप्रिय असला की लगेचच, त्याला उल्लेख Casanova म्हणून केला जातो. हा बघ आला Casanova…, स्वत:ला Casanova समजतो का… असं आपण अगदी सहज बोलतो. पण, तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीतला खरा Casanova माहितीये ? 

शाहरुख, सलमान, रणबीर तर आता आले. पण, यापूर्वी बऱ्याच वर्षांचा काळ मागे गेल्यास एक असा चेहरा डोळ्यांसमोर येतो की पाहणारेही पहिल्याच नजरेत त्याच्यावर भाळतात. 

लोकप्रिय कुटुंबात जन्म, कलाजगतात प्रस्थापितांची साथ या साऱ्यामुळं या अभिनेत्याच्या नावाला स्टारडम काही नवं नव्हतं. पण, तरीही संघर्ष त्यानंही केला. हिंदी चित्रपट सृष्टीचा डान्सिंग स्टार म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता म्हणजे शम्मी कपूर. (Shammi Kapoor )

बेधुंद करणारे डोळे, उजळ कांती, रुबाबदार अंदाज आणि वागण्याबोलण्यातून झळकणारं एक वेगळंच व्यक्तीमत्त्वं या साऱ्याच्या बळावर शमशेर राज कपूर अर्थात शम्मी कपूर यांनी अनेक तरुणींना घायाळ केलं. 

आजही त्यांचा महिला चाहतावर्ग वाखाणण्याजोगा. अशा या अभिनेत्यानं तत्कालीनं लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका गीता बाली यांच्याशी लग्न केलं. पण, हे नातं 9 वर्षेच टिकलं. गीता यांचं आजारपणामुळं अकाली निधन झालं आणि दोन मुलं सोबत असणारे शम्मी एकटे पडले. 

पुढे त्यांना अभिनेत्री मुमताज यांच्याशी लग्न करायचं होतं असंही सांगितलं जातं. पण, तसं होऊ शकलं नाही. गीता यांच्या निधनानंतर त्यांना मुमताज यांचा मोठा आधार मिळाला. त्यांनी आपल्या मुलांचा सांभाळ करावा, अशी शम्मी यांची अपेक्षा होती. कारकिर्द रंगात आलेली असताना अशी अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यासाठी हद्दच ठरली…  

मुमताज यांच्या कारकिर्दीला तेव्हाच वेग मिळाला होता. राजेश खन्ना यांच्याशी त्या स्क्रीन शेअर करणार होत्या. परिणामी त्यांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारला. त्यांचा हा निर्णय रास्त होता, अशीच प्रतिक्रिया शम्मी कपूर यांचे चिरंजीव आदित्य यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली. 

दरम्यान, गीता बाली यांच्यापूर्वी शम्मी यांचं नाव नूतन यांच्याशी जोडलं गेलं होतं. शम्मी कपूर यांचं नादिरा यांच्याशी असणारं नातंही त्यावेळी चर्चेत आलं होतं. पण, त्यांची ही नाती फार काळ टिकू शकली नाहीत. शम्मी कपूर यांचा स्वभाव आणि त्यांचं एकंदर व्यक्तीमत्त्वंच फार प्रभावी आणि भुरळ पाडणारं होतं, हे त्यांचे चित्रपट पाहूनच लक्षात येतं, नाही का? Source link

Leave a Reply