Headlines

हॅलो…आवाज येत नाहीये ! कॉलिंग दरम्यान ‘हा’ इश्यू तुम्हालाही येत असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्पी ट्रिक्स

[ad_1]

नवी दिल्ली: Smarrtphone चा वापर आता सामान्य झाला आहे. त्याचप्रमाणे स्मार्टफोन किंवा फीचर फोनमध्ये व्हॉईस कॉल दरम्यान अस्पष्ट आवाजाच्या समस्या देखील सामान्य झाल्या आहे. जर तुम्हीही या प्रकारच्या समस्येने त्रास असाल, तर आज आम्ही तुम्हाला त्याचे कारण आणि त्यापासून सुटका कशी मिळवावी या दोन्ही गोष्टींबद्दल सविस्तर सांगणार आहो. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे व्हॉईस कॉलवर आवाज न येण्याची किंवा स्पष्ट आवाज न येण्याची अनेक कारणे असू शकतात. पाहा डिटेल्स. अनेकदा नेटवर्कमुळे देखील आवाज स्पष्ट येत नाही, असे असल्यास तुम्ही तुमच्या फोनची नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करू शकता.

वाचा: लोक धडाधड खरेदी करताहेत ‘हे’ Portable AC, हवं तेव्हा सोबत करा कॅरी, खरेदीवर १०,००० पेक्षा अधिक ऑफ

नेटवर्क सेटिंग्ज कसे रीसेट करावे?

जर तुम्ही स्मार्टफोन युजर असाल, तर तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन मॅन्युअली ऑपरेटर निवडू शकता. यासोबतच तुम्ही कॉल सेटिंगमध्ये नेटवर्क प्रकार बदलू शकता. नेटवर्क प्रकार ऑटोवर ठेवणे हा एक चांगला पर्याय आहे.

फोन रीस्टार्ट करणे देखील उपयोगाचे:

स्मार्टफोन असो किंवा फीचर फोन, नेटवर्कची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तो रीस्टार्ट करू शकता. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला रीस्टार्ट करण्याचा पर्याय मिळतो, परंतु फीचर फोनमध्ये तुम्हाला फोन बंद करून पुन्हा चालू करावा लागेल. अशा प्रकारे, आपण नेटवर्कशी संबंधित समस्या दूर करू शकता.

आवाज तपासा:

कधी-कधी आपल्या फोनचा आवाज कमी होतो. व्हॉईस कॉल दरम्यान फोन स्पीकरवर ठेवून तुम्ही हे तपासू शकता. तसेच तुम्ही व्हॉल्यूम बटणांच्या मदतीने ते अड्जस्ट करू शकता. जर ही ट्रिक देखील तुमची समस्या सोडविण्यात अपयशी ठरली , तर तुमच्या फोनमध्ये नेटवर्क समस्या किंवा इतर काही समस्या असू शकतात.

Receiver चेक करा:

फोनच्या रिसीव्हरमध्ये धूळ जमा झाल्यामुळे अनेक वेळा कॉल करतानाही आवाज नीट येत नाही. आपण ते घरी सहजपणे दुरुस्त करू शकता. यासाठी तुम्हाला मऊ ब्रश किंवा कापूस लागेल. त्याच्या मदतीने तुम्ही फोनचा रिसीव्हर आणि Phone Speaker स्वच्छ करू शकता. तसेच, कधी- कधी फोनवरील कव्हर किंवा स्क्रीन प्रोटेक्टर देखील या समस्येचे कारण बनू शकतात. ते काढून देखील तुम्ही कॉल ट्राय करू शकता. या सर्व पर्यायांच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन ठीक करू शकत नसाल, तर तुम्ही सर्व्हिस सेंटर किंवा मोबाइल रिपेअरिंगच्या कोणत्याही दुकानात जावे लागेल. तसेच नेटवर्क समस्या असल्यास तुम्ही तुमच्या ऑपरेटरशी संपर्क साधू शकता.

वाचा: ६५०० रुपयांपर्यंत सुरुवातीची किंमत असेलेले ‘हे’ जबरदस्त Air Coolers ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये पोहोचतील तुमच्या घरी, पाहा ऑफर्स

वाचा: UPI वापरतांना युजर्स हमखास करतात ‘या’ चुका, तुम्हीही करत असाल तर लगेच अलर्ट व्हा, पाहा डिटेल्स

वाचा: २४ हजारांपर्यंत किंमत असलेले टॉप 5G स्मार्टफोन्स, ‘या’ सेलमध्ये मिळताहेत ६ हजारांपेक्षा कमीमध्ये, लगेच ऑफर पाहा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *