Headlines

राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं; जगबुडीसह ‘या’ नद्यांनी ओलांडली इशारा पातळी | heavy rainfall in maharashtra including wardha and gadchiroli jagbudi vainganga pranhita river cross alert line rmm 97

[ad_1]

मुंबई : गेल्या २४ तासांत वर्धा जिल्ह्यात सुमारे १३६ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे.

कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५.९ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र, जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट ३० जुलैपर्यंत सकाळी सहा ते सायंकाळी सातपर्यंत एकेरी वाहतूक सुरू ठेलण्यात आली आहे. सायंकाळी सातनंतर सकाळी सहापर्यंत परशुराम घाटातून वाहतूक पूर्णपणे बंध ठेण्यात आली आहे.

पुढील ३ दिवस राज्यात अतिवृष्टीची शक्यता, ‘या’ नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात मागील २४ तासांत सुमारे ११३ मिमी एवढा सरासरी पाऊस झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता आणि वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत. तर गोदावरी आणि इंद्रावती नदी धोका पातळीच्या वरून वाहत आहेत. सदर नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले आहेत. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत १० हजार ६०६ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. तसेच ३५ मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

Weather Alert! राज्यात पुढील तीन दिवस महत्त्वाचे, आज २४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सध्या ७३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून आत्तापर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात एकूण १०५ नगरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १८९ प्राणी दगावले आहेत.

महाराष्ट्रात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात
मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर -१, रायगड- महाड- १, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर-२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१ आणि गडचिरोली -१ अशा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१, वर्धा-२ अशा एकूण चार राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *