AgricultureBreaking NewsCrop insurance

पीकनुकसानीच्या पंचनाम्यासाठी आला , शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन गेला

कारी – उसमानाबाद जिल्ह्यातील कारी गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरवेलेला असेल तर पीक विमा कंपनीला पीक नुकसानाची पूर्व कल्पना ७२ तासाच्या आत द्यावी ,असा कंपनीचा नियम आहे. ही माहिती online किंवा offline पद्धतीने विमा कंपनीला देता येते. त्या नुसार कारी गावातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी बजाज अलायन्स ही कंपनी आहे . त्यानुसार विमा प्रतिनिधीने शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी पैशाची मागणी केली.ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले नाहित त्यांचे नुकसान जास्त असताना अल्प नुकसान दाखवण्यात आले. हे पैसे विमा प्रतिनिधीने रोख स्वरुपात तसेच फोन पे द्वारे घेतल्याचा आरोप कारी मधील शेतकऱ्यांनी केला आहे.

संबधित विमा प्रतिनिधी व त्याला जबाबदार असणारया व्यक्तीवर तत्काळ गुन्हे दाखल करावे.तसेच पुन्हा पीक नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!