‘हाताच्या बोटावर मोजण्याइतके सदस्य निवडून न आणणारे’ टीकेवरुन पवारांना मनसेचं उत्तर; म्हणाले, “आज बोटं मोजताय, उद्या…” | MNS MLA Raju Patil Slams Sharad Pawar for his comment about Raj Thackeray Party scsg 91


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर केलेल्या टीकेला आता मनसेनं प्रत्युत्तर दिलं आहे. विधीमंडळामध्ये आमदार निवडून आणण्याच्या मुद्द्यावरुन मनसेला लक्ष्य करणाऱ्या पवारांना पक्षाचे एकमेव आमदार असणाऱ्या राजू पाटील यांनी पक्षाच्यावतीने उत्तर दिलं आहे.

नक्की वाचा >> पत्रा चाळ प्रकरण : शरद पवारांच्या चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “…त्यानंतर मी नक्की…”

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना मनसेकडून राष्ट्रवादीचा उल्लेख करत शिवसेनेवर होणाऱ्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. “मनसेकडून असा आरोप केला जात आहे की शरद पवारांसोबतची शिवसेना ही राष्ट्रवादीच्या प्राणीसंग्रहालयातील प्राणी आहे. अशापद्धतीची आरोप मनसेनं केला आहे. या राजकीय वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता?” असा प्रश्न शरद पवारांना बुधवारच्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता.

नक्की पाहा >> “मी आजही फोन उचलून थेट उद्धव ठाकरेंशी…”; राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीसांचं विधान, शरद पवारांचाही केला उल्लेख

पवारांनी मनसेच्या मर्मावर बोट ठेवत या प्रश्नाला अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं होतं. “प्राणी वगैरेसंदर्भातील उल्लेख मी इथं करणार नाही. साधारणपणे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा ज्यांना विधीमंडळात (आमदार) निवडून आणता येत नाही त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचं?” असा खोचक प्रतिप्रश्न शरद पवार यांनी विचारला.

नक्की वाचा >> पत्रा चाळ प्रकरण: पवारांच्या चौकशीच्या मागणीला BJP चा पाठिंबा? पक्षाची भूमिका मांडताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “…तर गृहमंत्री चौकशी करतील”

शरद पवारांनी केलेल्या या विधानाच्या बातमीची लिंक शेअर करत राजू पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षांना जशास तसं उत्तर दिलं आहे. “आज बोटं मोजताय. उद्या बोटं मोडाल आणि परवा बोटं तोंडात घालाल,” असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. “आम्ही ‘धन’से कमी आहोत पण ‘मनसे’ लई आहोत,” असंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी संधी सर्वांना मिळते असा हॅशटॅगही वापरला आहे. तसेच शरद पवार यांना ‘आदर देतोय, आदर घ्या,’ असंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ठाकरे की शिंदे? दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी; म्हणाले, “परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी…”

मागील काही महिन्यांपासून मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये सातत्याने राजकीय विधानांवरुन खटके उडत असल्याचं चित्र दिसत आहे. आता शिवसेनेच्या नावाने सुरु झालेल्या या आरोप प्रत्यारोपांमध्येSource link

Leave a Reply