Headlines

Har Ghar Tiranga : Digital Tiranga मध्ये दिसणार तुमचा फोटो, ही ऑनलाइन ट्रिक वापरा

[ad_1]

नवी दिल्लीःUpload Selfie With Flag : Har Ghar Tiranga मोहीमेची सुरुवात १३ ऑगस्ट पासून सुरू केली जाणार आहे. या मोहिमे अंतर्गत प्रत्येक घरात तिरंगा लावण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने एक वेबसाइट सुद्धा सुरू केली आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक ऑप्शन मिळतात. तुम्ही या ठिकाणी सहज जोडले जावू शकतात. या ठिकाणी एक डिजिटल तिरंगाचा ऑप्शन दिला आहे. डिजिटल तिरंगात अनेक लोकांचा फोटो मिळून बनवला जावू शकतो.

तिरंगासोबत सेल्फी क्लिक करून तुम्ही स्वतःला डिजिटल तिरंगात सहभागी करून घेवू शकता. आतापर्यंत ९४ लाख हून जास्त लोकांनी आपला फोटो अपलोड केला आहे. फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट (https://harghartiranga.com/) वर जावे लागेल. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील. PIN A Flag सोबत तुम्हाला Upload Selfie With Flag सुद्धा दिसेल.

Selfie करू शकता अपलोड
Upload Selfie With Flag वर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप किंवा स्मार्टफोनची गॅलरी ओपन होईल. यानंतर तुम्ही सहज आपला फोटो अपलोड करू शकता. एकदा फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्ही फोटोची निवड करू शकता. जो फोटो चांगला असेल त्याला डिजिटल तिरंगा मध्ये स्थान दिले जाईल. सेल्फी अपलोड करण्याआधी सुनिश्चित करा की तो फोटो तिरंगा सोबत अपलोड करण्यासाठी योग्य आहे.

वाचा: Jio Plans: वारंवार रिचार्जची नाही गरज ! ‘या’ प्लान्समध्ये वर्षभरापर्यंतच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग आणि भरपूर डेटा

सर्टिफिकेटही करू शकता डाउनलोड
सोबत या ठिकाणाहून तुम्ही सर्टिफिकेट सुद्धा डाउनलोड करू शकता. या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. डिटेल भरल्यानंतर तुम्हाला तुमचे लोकेशन द्यावे लागेल. यानंतर तुम्ही सहज सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. भारत सरकारच्या पोर्टलवर अनेक लोकांच्या सेल्फीला जागा दिली आहे. जर तुम्हाला सेल्फी पसंत असेल तर या ठिकाणी तुम्ही दिसू शकता. परंतु, त्यासाठी तुम्हाला सेल्फी अपलोड करावी लागेल.

वाचा: PAN Card Fraud: मोबाईलवर तीन OTP आले आणि मिनिटांत महिलेच्या अकाऊंटमधून १ लाख रुपये गायब, पाहा डिटेल्स

वाचा: Home Inverter: घरातील इन्व्हर्टरकडे दुर्लक्ष बनू शकते स्फोटाचे कारण, अशी घ्या काळजी, राहा सुरक्षित, पाहा टिप्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *