Headlines

‘या’ अभिनेत्रीनं नाकारली होती 600 कोटींची संपत्ती; आज करतेय ‘हे’ काम

[ad_1]

Bollywood Actress Who Refused 600 Crore Property: सध्या कुठे ना कुठे चर्चा असतात त्या म्हणजे कोण्या एका सेलिब्रेटीनं महागडा बंगला घेतला, गाडी घेतली अथवा महागडा फ्लॅट तरी घेतला. मध्यतंरी सोनम कपूर आणि आलिया भट्टच्या महागड्या फ्लॅट्सची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यानंतर त्यांना ट्रोलही केलं होतं. त्यातून काही दिवसांपुर्वी बिपाशा बासूनंही आपल्या लेकीसाठी महागडी गाडी घेतली होती. त्यामुळे तिच्याही या महागड्या गाडीची चांगलीच चर्चा रंगलेली होती. तेव्हा सेलिब्रेटी हे या ना त्या कारणानं त्यांच्या अशा काही शानशौकीसाठी ओळखल्या जातात. परंतु तुम्हाला हे माहितीये का की अशीही एक अभिनेत्री आहे जिनं मात्र आपल्याला मिळणाऱ्या 600 कोटी संपत्तीला नकार दिला होता. त्यामुळे तिची बरीच चर्चा झाली होती परंतु यामागे एक कारणं होते. 

या अभिनेत्रीचं नावं आहे प्रिती झिंटा. प्रिती झिंटा ही अभिनेत्री 1990 ते 2000 च्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजही तिचे चित्रपट हे आवर्जून पाहिले जातात. सध्या ती हिंदी चित्रपटसृष्टीत फारशी सक्रिय नाही परंतु ती सोशल मीडियावर मात्र चांगलीच एक्टिव असते. तिची चर्चाही अनेकदा होताना दिसतात. त्यातून ती आयपीएलच्या पंजाब टीमची मालकीण आहे. यावेळी आयपीएललाही तिनं हजेरी लावली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तिही चर्चेत होते. आता आयपीएलची मॅच संपली आहे. परंतु प्रिटी झिंटाही या ना त्या कारणानं चर्चेत असते. 

कमाल आमरोहीची 600 कोटींची प्रोपर्टी प्रिटीला मिळणार होती जी तिनं नाकारली होती. याची अनेक वर्षे चर्चा झाली होती. मुंबईतल्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर कमाल अमरोही स्टूडिओच्या मालकी हक्काबाबत अमरोहीच्या मुलांमध्ये अनेक वर्षांपासून वाद होते. यावेळी प्रिटी झिंटाचेही नाव जोडले गेले होते. परंतु या प्रोपर्टीवर आपला अधिकार नसल्याचे तिनं सांगितले होते. 

हेही वाचा – कोट्यवधींची मालकीण असणारी Sara Ali Khan पाहा किती कंजूष!

शानदार अमरोही यांनी एका विधानात ते आपली संपुर्ण संपत्ती प्रिटीच्या नावे करू इच्छित आहोत असं म्हटलं होतं. परंतु या प्रोपर्टीशी आपला काहीही संबंध नाही असं म्हणताच तिनं ही प्रोपर्टी नाकारली होती. प्रिती अनेक मार्गांनी आपली कामं करत असते. ती आएपीएलमध्ये सक्रिय आहेच आहे. सोबतच तिनं ऋषिकेशमधील एका आश्रमातील 34 मुलांना दत्तक घेतले आहे ज्यांचा संपुर्ण खर्च ती एकटीनं करते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *