Headlines

हा उंदीर नाही… हा तर Stuart Little बॉलिवूडनं अभिनेत्रीनं शुटिंगदरम्यान सांगितला किस्सा

[ad_1]

Janhavi Kapoor Shares Experience of Mili: आजकाल चित्रपटांमध्ये प्राण्यांचेही अनेक रोल्स पाहायला मिळतात. त्यातून त्यांच्या छोट्या मोठ्या का होईना त्या भुमिकाही गाजतात. हॉलीवूड चित्रपटांमध्ये प्राण्यांना घेऊनही अनेक चित्रपट केले जातात. पण तुम्हाला माहितीये का की अशाच एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीनं (Bollywood actress) चक्क वीस मिनिटं फ्रिजमध्ये बसून एका उंदीरासोबत काम केलं आहे. (bollywood actress janhavi kapoor shares her experience on shooting scences with rat)

होय… जान्हवी कपूर याबद्दल एका मुलाखतीत उघड केले आहे की आपल्या मिली (Mili) या चित्रपटातून तिनं एका उंदीरासोबत स्क्रिन शेअर केली आहे. ती म्हणाली की, सेटवर माझ्यापेक्षा स्टार तर उंदीर होता. आम्ही दोघांनी फ्रिजमध्ये सीन शूट केला आहे. तेव्हा माझ्यापेक्षा त्या उंदीरवरच सगळे दया दाखवत होते. त्या उंदराला सगळी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळायची, अशी माहिती जान्हवीनं दिली. 

चित्रपटात जान्हवीसोबत एक उंदीरही फ्रीझरमध्ये दाखवण्यात आला आहे आणि शूटिंगदरम्यान जान्हवीपेक्षा जास्त उंदराची काळजी घेण्यात आली आहे. ज्याचा उल्लेख आता जान्हवीने मुलाखतीत केला आहे. 

या चित्रपटातून सस्पेन्स ड्रामा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. तेव्हा आपल्या या शूटिंगच्या अनुभवांबद्दल सांगताना जान्हवीनं नुकतीच एक (Janhavi Kapoor Recent Interview) मुलाखत दिली आहे. आपल्या अनुभवांबद्दल सांगताना तिनं सेटवरचे अनेक किस्से शेअर केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात काम करणं तिच्यासाठी तितकं सोप्पं नव्हतं. तिला अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागलं आहे. शूटिंगनंतर जान्हवीची प्रकृतीही बिघडली होती. (Janhavi Kapoor Shooting Experience)

जान्हवी कपूरने सांगितले की, या चित्रपटाचे शूटिंग -10 डिग्री तापमानात करण्यात आले आहे. यासाठी एक मोठा फ्रीज बनवला होता, ज्यात बसून तिला संपूर्ण शूट करायचं होतं. दिग्दर्शकाने तिला काही टिप्सही दिल्या होत्या आणि तिला जसं कम्फर्टेबल वाटतंय तसं राहावं असं त्यांनी तिला सांगितलं होतं. पण इतक्या कमी तापमानात शूटिंग करणं सोपं नक्कीच नव्हतं. शॉट दिल्यानंतर आपली प्रकृती बिघडायची, अशी माहिती तिनं दिली.  

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून जान्हवीनं सांगितलं की तीही लवकरच एका साऊथ इंडियन चित्रपटांच्या रिमेकमध्ये दिसू शकते. जान्हवीचे वडील बोनी कपूर (Bonney Kapoor) हे स्वतः बॉलिवूडचे निर्माते आहेत. आतापर्यंत त्यांनी नऊ साऊथ चित्रपटांचे हिंदीत रिमेक केले आहेत. आता आपल्या मुलीसाठीही ते अशाच एका चित्रपटाची निर्मिती करत असल्याचे त्यांनी सांगितले.  
 
जान्हवीचा मिली (Mili Movie Release date) हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होतो आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *